भारतीय टपाल विभागानं (post office) गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसनं एक जबरदस्त योजना आणली आहे. पोस्टाच्या नव्या योजनेत तुम्हाला एकरकमी पैसे जमा करावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला दरमहा पेन्शन स्वरुपात व्याजाचे पैसे मिळतील. यासोबतच तुम्ही जमा केलेली एकरकमी रक्कम मॅच्युरिटीनंतर परत केली जाणार आहे. पोस्टाच्या या नव्या योजनेचा मुदत कालावधी (मॅच्युरिटी) ५ वर्ष इतका असणार आहे.
पोस्ट ऑफिसच्या या जबरदस्त योजनेचं नावं Post Office Monthly Income Scheme Account (MIS)असं हे. या योजनेअंतर्गत तुम्हाला एकरकमी ५० हजार रुपये भरावे लागतील. त्यानंतर दरवर्षाला तुम्हाला व्याज स्वरुपात ३ हजार ३०० रुपये मिळतील. या योजनेमध्ये तुम्हाला किमान १००० आणि १०० च्या पटीमध्ये पैसे जमा करता येऊ शकतात. तर जास्तीत जास्त साडेचार लाखांपर्यंतची रक्कम तुम्हाला गुंतवता येऊ शकते. तर संयुक्त खात्यासाठीची कमाल मर्याला ९ लाख रुपये इतकी आहे.
किमान १ हजार रुपये भरण्याची मर्यादा
पोस्टाच्या या योजनेत कमीत कमी १ हजार रुपये पोस्ट ऑफिस एमआयएस खात्यात जमा करता येतात. एका व्यक्तीसाठी कमाल मर्यादा साडेचार लाख रुपये आहे. तर सध्याचा व्याज दर ६.६ टक्के इतका आहे.
साडेचार लाख जमा केले तर मोठे रिटर्न्स
पोस्ट ऑफिसच्या एमआयएस कॅल्क्लुलेटरच्या मते जर कुणी या खात्यात एकरकमी ५० हजार रुपये जमा केले तर दरमहा २७५ रुपये याप्रमाणे पाचवर्षांसाठी प्रत्येक वर्षी ३,३०० रुपये मिळतील. म्हणजेच पाच वर्षात १६,५०० रुपये व्याज स्वरुपात मिळकत होईल. त्याचपद्धतीनं १ लाख जमा केले तर तुम्हाला पाचवर्षात ३३ हजार रुपये अतिरिक्त मिळकत मिळते. जास्तीत जास्त ४.५ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा २,४७५ रुपये, एका वर्षात २९ हजार ७०० रुपये आणि पाच वर्षांत व्याज स्वरुपात तुम्हाला १,४८,५०० रुपये मिळतील.