Join us

आता चिंता नको, बँकेच्या बचत योजनेच्या तुलनेत पोस्टात मिळेल अधिक परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 10:31 AM

सहा महिने, १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षांचा मिळेल पर्याय.  

Business : टपाल कार्यालयात सुरक्षित गुंतवणूक करात येऊ शकते. त्यांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून सुरक्षित आणि अधिक परतावा मिळवू शकताे. गुंतवणुकीची अनेक साधने आहेत. मात्र इतर गुंतवणुकीच्या मार्गांमध्ये अधिक जोखीम असते. 

जिथे जोखीम जास्त असते तिथे इतर गुंतवणूक उत्पादनांच्या तुलनेत परतावादेखील जास्त असतो; पण पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आवर्ती ठेव खात्याची बाब वेगळी आहे. 

आवर्ती ठेव खाते योजना  :

पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खाते ही लहान रक्कम जमा करण्याची योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदार दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा करतात. चांगल्या व्याजदरासह लहान रक्कम जमा करण्याची ही सरकारी हमी योजना आहे.  

१०० रुपयांपासून गुंतवणुकीची मुभा :

आवर्ती खाते योजनेत फक्त १०० रुपयांच्या छोट्या रकमेतून गुंतवणूक करता येऊ शकते. गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. त्यामुळे गुंतवणूकदार आवर्ती (आरडी) खात्यात हवे तेवढे पैसे जमा करू शकतात. पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेत दरमहा १० हजार रुपये १० वर्षांसाठी जमा केल्यास तुम्हाला साधारणतः ५.८ टक्के व्याजाने परतावा मिळेल. मॅच्युरिटी झाल्यावर ही रक्कम १६ लाखांपेक्षा जास्त असेल.

हा आहे मुदतीचा कालावधी :

 पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये खाते पाच वर्षांसाठी उघडले जाते. जर तुम्हाला तेच खाते कोणत्याही बँकेत उघडायचे असेल, तर त्यासाठी सहा महिने, १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षांचा पर्याय मिळेल. 

 आवर्ती ठेव खात्यांमध्ये जमा केलेल्या पैशावर दर तिमाहीत वार्षिक दराने व्याज मोजले जाते. जे काही व्याज कमवाल ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी खात्यात चक्रवाढ व्याजासह जोडले जाते.

...तर खाते बंद होते

 आरडी खात्यात नियमितपणे पैसे जमा करावे लागतील. कोणत्याही कारणास्तव खात्यात कोणत्याही महिन्यात पैसे जमा केले नाहीत, तर अतिरिक्त रक्कम दंडाच्या स्वरूपात जमा करावी लागेल. 

 ही रक्कम किती असेल हे  पैसे जमा करण्यास किती उशीर केला यावर अवलंबून असेल. पैसे जमा केल्यानंतर दर महिन्याला एक टक्का दंड भरावा लागेल. हेदेखील लक्षात घ्या की सलग चार वेळेस हप्ते न भरल्यास खाते बंद केले जाते.

टॅग्स :व्यवसायपोस्ट ऑफिस