- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : आपल्या बँकेनंतर आता टपाल विभाग स्वत:चा ई-कॉमर्स व्यवसायही सुरू करण्याच्या तयारीत आहे. तो खासगी कंपन्यांच्या ई-कॉमर्ससारखीच सेवा देईल. त्यात पेमेंट आॅन डिलिव्हरीसोबतच या सेवेतील पेमेंटच्या गडबडीवरही अन्य व्यावसायिक कंपनीप्रमाणे रिफंड आदीची व्यवस्था असेल. येत्या सहा महिने ते वर्षभरात हा व्यवसाय सुरू होईल, अशी आशा आहे.
याबद्दल प्रदीर्घ काळपासून मंथन सुरू होते. परंतु, नुकतीच दूरसंचार मंत्रालयानेही त्याला संमती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आपला ई-कॉमर्स व्यवसाय सुरू करण्याआधी टपाल विभागाला सर्व सरकारी मंत्रालये व विभागांकडून चालविला जाणारा ई-कॉमर्स व्यवसायाला आपल्या एका केंद्रीयकृत ई-कॉमर्स पोर्टलवर आणावयाचा आहे. सध्या अनेक मंत्रालये वेगळ््या स्तरावर आपल्या उत्पादनांची मार्केटिंग करीत वेगवेगळ््या प्लॅटफॉर्मवर ती विकत आहेत.
टपाल विभागाचा एक अधिकारी म्हणाला की, विभागाला पहिल्या दिवसापासून यातून लाभ मिळतील. कारण विभागाकडे देशातील
दीड लाखांपेक्षा जास्त कार्यालय आणि पोस्टमनचे मोठे नेटवर्कही
आहे.
टपाल विभागही येणार ई-कॉमर्स व्यवसायात
आपल्या बँकेनंतर आता टपाल विभाग स्वत:चा ई-कॉमर्स व्यवसायही सुरू करण्याच्या तयारीत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:37 AM2018-12-05T05:37:20+5:302018-12-05T05:37:37+5:30