नवी दिल्लीः भारतीय पोस्ट ऑफिसनं ग्राहकांना नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भारतीय पोस्ट ऑफिसनं इंडियन पोस्टल ऑर्डरला इलेक्ट्रिक फॉर्ममध्ये ऑनलाइन खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याला eIPO असं म्हटलं जातं. अशा प्रकारे अर्जदाराला ऑनलाइन eIPO खरेदी करता येणार आहे. त्यामुळे पोस्टात जाण्याच्या फेऱ्या वाचणार आहेत. अर्जदाराला 10 रुपये, 20 रुपये आणि 50 रुपयांपर्यंत ऑनलाइन eIPO खरेदी करता येणार आहे.
फी जमा करण्याबरोबरच eIPOचा वापर RTI फाइल करण्यासाठीही केला जातो. जर तुम्ही ऑनलाइन eIPO खरेदी करायचा आहे, तर आपल्याला ePost Office पोर्टलवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. ऑनलाइन eIPO खरेदी करण्यसाठी आपण कोणत्याही बँकेचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरू शकता. याशिवाय नेट बँकिंगच्या माधम्यातूनही पेमेंट करता येते.
पेमेंट केल्यानंतर eIPO स्क्रीनवर दिसणार आहे. मग त्याला प्रिंट करावं लागेल. या प्रिंटला सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपीच्या स्वरूपात वापरता येते.
आता ऑनलाइन खरेदी करता येणार पोस्टल ऑर्डर, नोकरीसाठी अर्ज करणं होणार सोपं
भारतीय पोस्ट ऑफिसनं ग्राहकांना नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 04:12 PM2019-05-02T16:12:06+5:302019-05-02T16:12:24+5:30