Join us  

पोस्टातील बचत खाते फायद्याचे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 8:36 AM

छोटी रक्कम गुंतवून मिळवा चांगला परतावा

लोकमत न्यूज नेटवर्क : भारतीयांचे गुंतवणुकीचे काही पारंपरिक मार्ग निश्चित ठरले आहेत. त्यात पोस्टातील बचत खात्याला प्राधान्य असते. अनेक लोकांची पोस्टात खाती असतात. त्यातून त्यांना बऱ्यापैकी परतावाही मिळत असतो. आताही पोस्ट खात्याने एक चांगली योजना आणली आहे ज्यात छोटी रक्कम गुंतवून चांगला परतावा प्राप्त करण्याची संधी आहे. योजनेचा कालावधी ?ग्राम सुमंगल योजना १५ आणि २० वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे. वयाची १९ वर्षे पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. १५ वर्षांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची ४५ वर्षे पूर्ण असावीत तर २० वर्षांच्या योजनेसाठी ही वयोमर्यादा ४० आहे.  काय आहे योजना?पोस्ट खात्याने ‘ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा’ योजना आणली आहे. या योजनेत दररोज ९५ रुपये गुंतवायचे असून त्यावर मिळणारा परतावा तब्बल १४००००० रुपयांपर्यंतचा आहे. ही एक एन्डोव्हमेंट योजना असून पोस्टात बचत खाते असलेली व्यक्ती घेऊ शकते. ठरावीक मुदतीनंतर खातेधारकाला निश्चित रक्कम, मनी बॅक आणि विमा कवच हेही प्राप्त होते या योजनेतून.कोणासाठी उपयुक्त?ज्यांना ठरावीक कालावधीनंतर पैशांची गरज असले त्यांच्यासाठी ‘ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा’ ही अगदी सुयोग्य योजना आहे. कारण या योजनेत तीनदा मनी बॅकची संधी मिळते. ग्राहकाला १० लाख रुपयांपर्यंतची रक्कम देऊ केली जाते.