Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्रांमुळे टपाल खात्याला मोठा भुर्दंड

पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्रांमुळे टपाल खात्याला मोठा भुर्दंड

मोबाईल मॅसेजिंग, ई-मेल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे टपाल खात्यातील प्रचलित पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्राला उतरती कळा लागली आहे.

By admin | Published: August 21, 2015 10:08 PM2015-08-21T22:08:28+5:302015-08-21T22:08:28+5:30

मोबाईल मॅसेजिंग, ई-मेल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे टपाल खात्यातील प्रचलित पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्राला उतरती कळा लागली आहे.

Postcard, the big post for the Postal Department due to the inter-regional letters | पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्रांमुळे टपाल खात्याला मोठा भुर्दंड

पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्रांमुळे टपाल खात्याला मोठा भुर्दंड

राम देशपांडे, अकोला
मोबाईल मॅसेजिंग, ई-मेल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे टपाल खात्यातील प्रचलित पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्राला उतरती कळा लागली आहे. याचा वापर पूर्वीएवढा राहिला नसला नसून, टपाल खात्याला वर्षाकाठी प्रत्येक पोस्टकार्ड व आंतरदेशीय पत्रांच्या छपाईमागे अनुक्रमे ७.0३ व ४.९३ रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. हा छपाईखर्च त्यांच्या विक्री किमतीपेक्षा अधिक असल्याने टपाल खात्याला दरवर्षी आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचे दिसून आले आहे.
संगणक युगात ई-मेल, मोबाईल मॅसेजिंग आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे डाक विभागाची ही सशक्त माध्यमे काळाच्या ओघात मागे पडू लागली आहेत. आधुनिक युगात क्षणार्धात संदेशवहन करणाऱ्या माध्यमांची मागणी वाढल्याने, कधीकाळी संपूर्ण देशवासीयांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पोस्टकार्ड आणि अंतर्देशीय पत्रांची मागणी घटली आहे. दुसरीकडे निर्मिती खर्च वाढत असल्याने टपाल खात्याला मोठे नुकसान सहन करावे लगत आहे.
डाकघरांमध्ये वितरित केले जाणारे अांतरदेशीय पत्र, पोस्टकार्ड, पंजीकृत लिफाफे, हवाई पत्र, मोहोर चिन्हांकित लिफाफे, डाक तिकिटांची निर्मिती केंद्र शासनाद्वारे प्रत्येक राज्यात स्थापित करण्यात आलेल्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात केली जाते.
खर्चाचा मेळ बसविण्याकरिता टपाल खात्याने वर्षांपूर्वी १५ पैसे दराने विकल्या जाणाऱ्या पोस्टकार्डाची किमत ५0 पैसे, तर आंतरदेशीय पत्राचे दर ७५ पैशांवरून २.५0 रुपये केली; मात्र टपाल खात्याला २0१३-१४ या आर्थिक वर्षात छपाईसाठी प्रती पोस्टकार्ड ७.0३ रुपये, तर प्रती आंतरर्देशीय पत्राच्या ४.९३रुपये नुकसान सोसावे लागले. या पत्रांच्या मागणीत २0११-१२ आणि २0१२-१३ मध्ये अनुक्रमे ३.३ आणि ५.२ टक्क्यांची घट आढळून आली आहे.

Web Title: Postcard, the big post for the Postal Department due to the inter-regional letters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.