Join us  

पोस्टही झाले मालामाल

By admin | Published: January 06, 2017 11:58 PM

नोटांबदीनंतर पोस्ट खात्यात तब्बल ३२ हजार कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.

नवी दिल्ली : नोटांबदीनंतर पोस्ट खात्यात तब्बल ३२ हजार कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बाद झाल्यानंतर नागरिकांनी नोटा बँकात, पोस्ट खात्यात जमा केल्या. देशभरात पोस्ट खात्याचे अनेक कार्यालये आहेत. पोस्ट खात्याचे सचिव बी. व्ही. सुधाकर यांनी सांगितले की, २४ नोव्हेंबरपर्यंतच पोस्टाने ५७८ लाख नोटा बदलून दिल्या आहेत. याची किंमत ३६८० कोटी रुपये आहे. पाचशे आणि हजारच्या एकूण ३२ हजार ६३१ कोटी रुपयांच्या नोटा बदलून दिल्या आहेत. याच काळात पोस्ट आॅफिसमधून ३.५ हजार कोटी नागरिकांनी काढले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात अनेक बँकां आणि पोस्ट आॅफिसमोर नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. पोस्ट खात्याच्या ग्रामीण भागातही अनेक शाखा आहेत. देशात मोठे जाळे असल्यामुळे नागरिकांकडून जमा झालेल्या नोटांनी तूर्तास पोस्टाची तिजोरी मात्र मालामाल झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)