लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना’ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांवर सोपविण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला नुकतीच मंजुरी दिली आहे. या योजनेत १ कोटी घरांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. या योजनेसाठी भारतीय डाक विभागास नोडल एजन्सी म्हणून मान्यता दिली आहे. डाक विभाग पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील. लोकांना लाभाची माहिती देतानाच मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये नोंदणीही करतील.
वार्षिक १५ हजार रुपयांचे उत्पन्नही मिळणार
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी १३ फेब्रुवारी रोजी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेत ३०० युनिटपर्यंत मोफत वीज तर मिळेलच; पण, १५,००० रुपये वार्षिक उत्पन्नही मिळेल.