Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स-निफ्टी पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक पातळीवर! बँकिंग-ऊर्जा शेअर्समध्ये खरेदी; तर 'या' क्षेत्रात घसरण

सेन्सेक्स-निफ्टी पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक पातळीवर! बँकिंग-ऊर्जा शेअर्समध्ये खरेदी; तर 'या' क्षेत्रात घसरण

Stock Market : निर्देशांकावर नजर टाकली तर निफ्टी बँक, फार्मा, रियल्टीमध्ये चांगली वाढ दिसून आली. शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दाखवली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 04:08 PM2024-09-25T16:08:32+5:302024-09-25T16:09:04+5:30

Stock Market : निर्देशांकावर नजर टाकली तर निफ्टी बँक, फार्मा, रियल्टीमध्ये चांगली वाढ दिसून आली. शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दाखवली होती.

power grid axis bank ntpc leads stock market come back from days low sensex nifty closes at all time high | सेन्सेक्स-निफ्टी पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक पातळीवर! बँकिंग-ऊर्जा शेअर्समध्ये खरेदी; तर 'या' क्षेत्रात घसरण

सेन्सेक्स-निफ्टी पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक पातळीवर! बँकिंग-ऊर्जा शेअर्समध्ये खरेदी; तर 'या' क्षेत्रात घसरण

Stock Market : अमेरिका आणि चीन सरकारने घेतलेल्या निर्णयांचा भारतीय शेअर बाजारात सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांक गाठण्यात यशस्वी झाले आहेत. बुधवारी (२५ सप्टेंबर २०२४) व्यापार सत्रात, BSE सेन्सेक्सने ८५,२४७.४२ चा नवीन उच्चांक गाठला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने २६०३२.८० अंकांचा नवा उच्चांक गाठला. सकाळी तेजीत उघडलेला बाजार दुपारपर्यंत खाली गेला होता. मात्र, शेवटच्या सत्रात शेअर बाजारात पुन्हा उत्साह पाहायला मिळाला. दिवसाच्या नीचांकीवरून सेन्सेक्सने ५०० अंकांची तर निफ्टीने १६१ अंकांची रिकव्हरी पाहिली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स २५६ अंकांच्या उसळीसह ८५,१७० वर बंद झाला तर निफ्टी ६४ अंकांच्या उसळीसह २६००४ वर बंद झाला.

शेवटच्या सत्रात रिकव्हरी
आज शेवटच्या तासात शेअर बाजारात जोरदार खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही विक्रमी पातळीवर बंद झाले. दिवसभर हिरवा आणि लाल रंगात स्विंग केल्यानंतर, शेवटच्या तासात बाजारात खरेदीचे पुनरागमन झाले. ज्यामुळे दोन्ही निर्देशांक हिरव्यात गेले. निर्देशांकावर नजर टाकली तर निफ्टी बँक, फार्मा, रियल्टीमध्ये चांगली वाढ दिसून आली. शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरण नोंदवली होती.

सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकींग केल्याने काही शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी तोट्यात राहिला, तर हाँगकाँगचा हँग सेंग, जपानचा निक्केई 225 आणि चीनचा शांघाय कंपोझिट वधारला. मंगळवारी अमेरिकन बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय मानक ब्रेंट क्रूड ०.२८ टक्क्यांनी घसरून ७४.९६ डॉलर प्रति बॅरलवर आले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) मंगळवारी विक्री करणारे होते. त्यांनी निव्वळ २,७८४.१४ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

सेक्टरॉल अपडेट 
आजच्या व्यवहारात बँकिंग, फार्मा, मेटल, रिअल इस्टेट, मीडिया, ऊर्जा आणि इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. तर ऑटो, आयटी, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स घसरून बंद झाले. आजच्या व्यवसायातही मिडकॅप आणि स्मॉलकॅप चमकले नाहीत. निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक घसरुन बंद झाले.

बाजारातील वाढीमुळे मार्केट कॅप घसरले
सेन्सेक्स आणि निफ्टी जोरदार वाढीसह बंद होत असतानाही मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या घसरणीमुळे शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्स मार्केट कॅप ४७५.२४ लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात ४७६.०७ लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते.

Web Title: power grid axis bank ntpc leads stock market come back from days low sensex nifty closes at all time high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.