Lokmat Money > बिझनेस न्यूज > पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."

पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."

Power Grid Share: एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएचं सरकार येणार असल्याचं दिसून येत आहे. यानंतर शेअर बाजारातही जोरदार तेजी दिसून आली. या सरकारी कंपनीच्या शेअरनंही आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 02:35 PM2024-06-03T14:35:56+5:302024-06-03T14:36:24+5:30

Power Grid Share: एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएचं सरकार येणार असल्याचं दिसून येत आहे. यानंतर शेअर बाजारातही जोरदार तेजी दिसून आली. या सरकारी कंपनीच्या शेअरनंही आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

Power share shines power grid government owns 51 percent 13 Experts Said Buy Prices Will Rise lok sabha 2024 exit polls | पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."

पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."

Power Grid Share: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचा शेअर आज, सोमवार, ३ जून रोजी बीएसईवर १२ टक्क्यांनी वधारून ३४६.९० रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला. एक्झिट पोलनंतर पीएसयू शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली आहे. पॉवर ग्रीडच्या मार्केट कॅपनं ३ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. 
 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एनटीपीसी (NTPC) आणि काही अन्य कंपन्यानंतर या पातळीपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेल्या मोजक्या सरकारी कंपन्यांपैकी ही एक आहे. खरं तर एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर आज शेअर बाजारात विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. यासोबतच पीएसयू शेअर्समध्येही वाढ झाली आहे.
 

सरकारकडे ५१.३४ टक्के हिस्सा
 

सरकारी कंपन्यांच्या शेअर्ससह अदानी समूहाचे शेअर्स, इन्फ्रा, एनर्जी अशा सरकारच्या आर्थिक अजेंडाशी संबंधित शेअर्स भविष्यातही कायम राहण्याची शक्यता बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. पॉवर ग्रीडमध्ये सरकारचा ५१.३४ टक्के हिस्सा असून, त्याचं मूल्य १.६ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.
 

मार्च तिमाही निकाल
 

मार्च २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत पॉवर ग्रीडच्या महसुलात २.५ टक्क्यांची घट झाली आहे, तर निव्वळ नफ्यात २.१ टक्क्यांची घट झाली आहे. कंपनीच्या एबिटडा मार्जिनमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत ६०० बेसिस पॉईंटची घट झाली आहे. असं असलं तरी सीएलएसएनं ३४५ रुपयांच्या टार्गेट प्राइससह शेअरवरील 'आउटपरफॉर्म' रेटिंग कायम ठेवलं आहे. ब्रोकरेजनं आर्थिक वर्ष २०२४ ला पॉवर ग्रीडसाठी बाजारातील हिस्सा वाढवण्याचं वर्ष म्हटलं आहे.
 

काय म्हणाले तज्ज्ञ? 
 

ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार पॉवर ग्रीडचं कव्हरेज करत असलेल्या २१ विश्लेषकांपैकी १३ विश्लेषकांना 'बाय' रेटिंग आहे, एकानं 'होल्ड', तर इतर सात विश्लेषकांनी 'सेल' करण्याची शिफारस केली आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर ४३ टक्क्यांनी वधारला असून, या कालावधीत सुमारे ७ टक्क्यांनी वधारलेल्या निफ्टी ५० ला मागे टाकलx आहे. गेल्या १२ महिन्यांत या शेअरने ९३ टक्के परतावा दिला असून गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट झाले आहेत.
 

(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Power share shines power grid government owns 51 percent 13 Experts Said Buy Prices Will Rise lok sabha 2024 exit polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.