स्मॉल सेव्हिंग्स स्किमचा विचार करता, पब्लिक प्रोव्हिडंट फंड अर्थात PPF ही दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छिनाऱ्यांसाठी एक अत्यंत उत्तम योजना आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 15 वर्षांचा आहे. महत्वाचे म्हणजे, या योजनेत इतर अनेक योजनांच्या तुलनेत व्याजही चांगले मिळते. तसेच PPF ही एक गॅरंटेड परतावा देणारी सरकार योजना आहे. या योजनेच्या माध्यमाने आपण कोट्यधीश अथवा करोडपतीही होऊ शकतात. हे अकाउंट कुठल्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येऊ शकते.
व्याज आणि गुंतवणुकीचे फायदे -
गेल्या काही वर्षांत PPF वरील व्याज दर कमी झाला आहे. मात्र, अद्यापही यावर 7.1 टक्का व्याजदर मिळतो. विशेषतः नोकरी करणाऱ्या लोकांत ही योजना अत्यंत पॉप्युलर आहे. बँकेच्या बचत खात्यात पैसे ठेवल्यास 3 ते 3.5 टक्का एवढे वार्षिक व्याज मिळते. तसेच फिक्स्ड डिपॉझिटवरही पीपीएफच्या तुलनेत कमीच व्याज मिळते. आणखी एक फायदा म्हणजे, इक्विटी प्रमाणे हा परतावा बाजाराशी लिंक नाही. तसेच अनिश्चिततेच्या काळातही नर्धारीत व्याजदराप्रमाणेच परतावा मिळेल. तर, कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूक बुडण्याचाही धोका असतो. याशिवाय पोस्ट ऑफिसची योजना असल्याने येथे आपले पैसेसी सुरक्षित असतात.
मॅच्योरिटीवर किती मिळेल परतावा? -
जमा करावयाची कमाल मासिक रक्कम : 12,500 रुपये (वर्षाला 1.50 लाख रुपये)
व्याज दर : 7.1 टक्के (वार्षिक चक्रवाढ व्याज)
15 वर्ष मॅच्युरिटीनंतरची रक्कम : 40,68,209 रुपये
एकूण गुंतवणूक : 22,50,000
व्याजाचा फायदा : 18,18,209 रुपये
1 कोटी रुपये निधीसाठी किती वेळ लागतो -
जमा करावयाची कमाल मासिक रक्कम : 12,500 रुपये (वर्षाला 1.50 लाख रुपये)
व्याज दर : 7.1 टक्के (वार्षिक चक्रवाढ व्याज)
25 वर्षांनंतर मॅच्युरिटीवरील रक्कम : 1.03 कोटी रुपये.
एकूण गुंतवणूक : 37,50,000
व्याजाचा फायदा : 65,58,015 रुपये.