नवी दिल्ली : पीपीएफमधील (PPF) गुंतवणूक ही अतिशय सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक मानली जाते. दरम्यान, सरकार पीपीएफ गुंतवणूकीच्या सुरक्षेची हमी देते, म्हणूनच ती सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पीपीएफ खात्यात (PPF Account) पैसे जमा न करताही तुम्ही याचा फायदा घेऊ शकता, हे जाणून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. तर पीपीएफ खात्यामध्ये एक पर्याय आहे की, तुम्ही गुंतवणूक न करताही व्याजाचा लाभ घेऊ शकता.
पीपीएफ अकाउंट काय आहे?
पीपीएफ खाते पोस्ट ऑफिससह निवडक शाखांमध्ये 15 वर्षांच्या कालावधीसाठी उघडता येते. तुम्ही त्यात दरवर्षी किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. खातेदाराला दीड लाखांपेक्षा जास्त रकमेवर व्याज मिळत नाही.
15 वर्षांनंतर दोन पर्याय
15 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही पीपीएफ खात्यातून पैसे काढू शकता. परंतु यावेळी तुमच्याजवळ दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे तुम्ही पूर्वीप्रमाणे गुंतवणूक करून खाते 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता. यासाठी तुम्हाला लेखी विनंती करावी लागेल.
अशाप्रकारे गुंतवणुकीशिवाय मिळेल व्याज
15 वर्षांनंतर दुसरा पर्याय म्हणून, तुम्ही पीपीएफ खाते गुंतवणुकीशिवाय ऑपरेट करू शकता. यामध्ये, तुमच्या गुंतवणुकीसह 15 वर्षात जी रक्कम मॅच्योर झाले आहे, त्यावर सरकारकडून दरवर्षी निश्चित व्याज मिळत राहील. यामध्ये तुम्हाला कोणतेही पैसे जमा करण्याची गरज नाही.
पीपीएफ खात्यावरील 5 फायदे!
- सध्या पीपीएफ खात्यात 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे.
- पीपीएफ खात्यात जमा केलेल्या पैशांवर आयकर सवलत घेता येते.
- पीपीएफ खात्यातून मॅच्युरिटीवर मिळणारा पैसा करमुक्त असतो.
- पीपीएफ खात्याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असतो.
- या खात्यात जमा केलेल्या रकमेवर भारत सरकार हमी देते.