Join us  

सुकन्‍या योजनेसह छोट्या बचत Small Saving ठेवीदारांना झटका बसणार?; केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 3:12 PM

Small Savings Scheme Interest Rate : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच सरकारपुढे अर्थव्यवस्थेला सावरण्याचं देखील आव्हान आहे.

नवी दिल्ली - छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक Small Savings Scheme Interest Rate करणाऱ्यांना लवकरच एक झटका बसण्याची शक्यता आहे. 1 जुलैपासून पोस्ट ऑफिससह छोट्या बचत योजनांवरील व्याज दरात घट होण्याची शक्यता असल्याचा दावा हा मीडिया रिपोर्ट्समधून करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार, सरकार या योजनांवरील व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. जर सरकारच्या वतीने असा काही निर्णय घेण्यात आला तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), सुकन्‍या समृद्धी योजना, सीनियर सिटीजन्स स्‍कीम, किसान विकास पत्र, पोस्‍ट ऑफिस टाइम डिपॉजिट आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) या योजनांमधील गुंतवणूक दारांना फटका बसण्याची चिन्ह आहेत.  

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच सरकारपुढे अर्थव्यवस्थेला सावरण्याचं देखील आव्हान आहे. यामुळे सरकारला आता कर्ज काढावं लागेल अशी परिस्थिती आहे. कर्ज काढणे म्हणजेच बाँड यील्ड जास्त वाढू शकतं. आर्थिक संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारपुढे छोट्या बचत खात्यांवरील व्याज दर कमी करण्याचा पर्याय आहे. मात्र, असं केल्यास गुंतवणूकदारांची नाराजी केंद्र सरकारवर वाढू शकते. 

पेट्रोल, डिझेल आणि रोजच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव याआधीच वाढलेले आहेत. महागाईमुळे सामान्य नागरिकांच्या समस्या वाढलेल्या आहेत. छोट्या बचत खात्यांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने एप्रिल ते जून या तिमाहीसाठी घेतला होता. मात्र, जनतेच्या नाराजीमुळे अवघ्या 24 तासांत हा निर्णय सरकारला मागे घेत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जाहीर करावं लागलं होतं. त्यामुळे छोट्या योजनांमध्ये बचत करण्यांना दिलासा मिळाला होता. 

सध्या किती व्याज मिळते?

सध्या सर्वाधिक व्याज सुकन्‍या समृद्धी योजनेवर मिळते. छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर टॅक्समध्ये सूट देखील मिळते.

सेविंग डिपॉजिट - 3.50%1 वर्षाची ठेव - 4.40%2 वर्षांची ठेव - 5.00%3 वर्षांची ठेव - 5.10%5 वर्षांची ठेव - 5.80%5 वर्षांची रिकरिंग ठेव - 5.30%सीनियर सिटीजन्स सेविंग्‍स स्‍कीम - 6.50%मंथली इनकम अकाऊंट -  5.70%नॅशनल सेविंग्‍ज सर्टिफिकेट - 5.90%पब्लिक प्रॉव्हिडंट फंड - 6.40%किसान विकास पत्र -  6.20%सुकन्‍या समृद्धी योजना - 6.90%

एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :पैसाभारतव्यवसायअर्थव्यवस्थाकोरोना वायरस बातम्या