Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुमच्या मुलांना लखपती बनवतील 'या' स्कीम्स... जास्त नाही, महिन्याला ₹५०० करावी लागेल गुंतवणूक

तुमच्या मुलांना लखपती बनवतील 'या' स्कीम्स... जास्त नाही, महिन्याला ₹५०० करावी लागेल गुंतवणूक

मुलांना बचतीचं महत्त्व शिकवण्यासाठी, आपण घरी एक पिगी बँक खरेदी करतो आणि त्यात त्यांचे पैसे टाकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 10:36 AM2024-02-24T10:36:56+5:302024-02-24T10:37:51+5:30

मुलांना बचतीचं महत्त्व शिकवण्यासाठी, आपण घरी एक पिगी बँक खरेदी करतो आणि त्यात त्यांचे पैसे टाकतो.

ppf ssy sip schemes will make your kids a millionaire rs 500 per month investment will make huge corpus | तुमच्या मुलांना लखपती बनवतील 'या' स्कीम्स... जास्त नाही, महिन्याला ₹५०० करावी लागेल गुंतवणूक

तुमच्या मुलांना लखपती बनवतील 'या' स्कीम्स... जास्त नाही, महिन्याला ₹५०० करावी लागेल गुंतवणूक

Best Schemes for Children: मुलांना बचतीचं महत्त्व शिकवण्यासाठी, आपण घरी एक पिगी बँक खरेदी करतो आणि त्यात त्यांचे पैसे टाकतो. जेणेकरून त्यांचे पैसे जमा होतात आणि लहान बचतीमुळे मोठी रक्कम कशी होऊ शकते याची शिकवण त्यांना मिळते. आपणही अगदी असेच करू शकतो आणि लहान रकमेतून आपण मुलांसाठी लाखो रुपयांपर्यंत निधी जोडू शकतो.
 

अशा अनेक योजना आहेत ज्यात फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. या योजनांमध्ये दरमहा 500 रुपयेही जमा केले, तर वर्षभरात 6000 रुपये जमा होतील. तुम्हाला ठेवीवर व्याज मिळेल आणि काही कालावधीतच चांगली रक्कम जमा होईल. ज्याद्वारे तुम्ही मुलांच्या कोणत्याही गरजा सहज पूर्ण करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही 500 रुपयांच्या मासिक ठेवीसह लाखो रुपये देखील जोडू शकता. जाणून घेऊ अशाच काही उत्तम योजनांबद्दल.
 

पीपीएफ
 

PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक सरकारी योजना आहे. या योजनेत दरवर्षी किमान 500 रुपये जमा करणं आवश्यक आहे. परंतु तुम्ही मुलांच्या नावावर दरमहा 500 रुपये जमा केल्यास, तुम्ही चांगली रक्कम जोडू शकता. या योजनेत तुम्हाला 7.1 टक्के दरानं चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. ही योजना 15 वर्षांत मॅच्युअर होते. यामध्ये तुम्ही दरमहा 500 रुपये जमा केल्यास तुम्हाला वार्षिक 6000 रुपये आणि 15 वर्षांत 90,000 रुपये जमा होतील. पीपीएफ कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला 15 वर्षात 72,728 रुपये व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 1,62,728 रुपये मिळतील. जर तुम्ही ही योजना आणखी 5 वर्षे चालू ठेवली तर 20 वर्षांत 2,66,332 रुपये जमा होतील.
 

सुकन्या समृद्धी योजना
 

जर तुम्ही मुलीचे वडील असाल तर तुम्ही तिच्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. या योजनेत तुम्ही दरवर्षी किमान 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. सध्या या योजनेत 8.20 टक्के व्याज दिलं जात आहे. यामध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते आणि स्कीम 21 वर्षात मॅच्युअर होते. या योजनेत तुम्ही दरमहा 500 रुपये गुंतवल्यास, 15 वर्षांत तुम्ही एकूण खर्च 90 हजार रुपये गुंतवाल. तुम्ही 15 ते 21 वर्षांच्या दरम्यान कोणतीही गुंतवणूक करणार नाही, परंतु तुमच्या रकमेवर 8.2 टक्के दरानं व्याज जोडले जाईल. अशात, तुम्हाला व्याज म्हणून 1,87,103 रुपये मिळतील. मॅच्युरिटीवर तुम्हाला 2,77,103 रुपये मिळतील. 
 

एसआयपी
 

एसआयपीद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो आणि सरासरी 12 टक्के परतावा मिळतो. अशा परिस्थितीत, दीर्घकाळापर्यंत, तुम्ही या योजनेद्वारे मुलांसाठी चांगली रक्कम जोडू शकता आणि मुलांच्या शिक्षणासाठी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी वापरू शकता. चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार SIP मध्ये गुंतवलेली रक्कम कधीही वाढवू शकता. यामुळे तुमचा नफा आणखी वाढतो. तुम्ही त्यात दरमहा 500 रुपये गुंतवल्यास 15 वर्षांनंतर 12 टक्के व्याजदराप्रमाणे तुम्ही 2,52,288 रुपये मॅच्युरिटी रक्कम म्हणून घेऊ शकता. दुसरीकडे, तुम्ही आणखी 5 वर्षे म्हणजे 20 वर्षे गुंतवणूक करत राहिल्यास, 12 टक्के दराने तुम्हाला 4,99,574 रुपये मिळतील.
 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: ppf ssy sip schemes will make your kids a millionaire rs 500 per month investment will make huge corpus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.