सरकारकडून जनतेच्या फायद्यासाठी अनेक योजना चालवल्या जात आहेत. यामधून गुंतवणूकदारांनागुंतवणूक करण्याची संधीही मिळते. गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या दृष्टीने कुठल्याही सरकारी योजनेत किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंडसारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवत असतात. त्याचे अनेक फायदेही असतात.
पीपीएफसारख्या अकाऊंटमध्ये लोकांना त्यांच्या गुंतवलेल्या पैशावर व्याज मिळते. सरकारकडून या योजनेवर हमी दिली जाते. त्यामुळे या स्किमध्ये जोखीम फार कमी असते. तर दर तीन महिन्यांमध्ये या खात्यामध्ये दिल्या जाणाऱ्या व्याजदराचा आढावा घेण्यात येते. आवश्यकता भासल्यास व्याजदरामध्ये बदल केला जातो.
सध्या पीपीएफ अकाऊंटवरील पैशांवर ७.१ टक्के वार्षिक दराने व्याज दिले जाते. लोक या खात्यांमध्ये आपले पैसे गुंतवून या दराने व्याज मिळवू शकता. तर सरकार आढावा घेऊन व्याज दरात बदल करते. त्यामुळे लोकांना बदललेल्या व्याजदराने व्याज मिळते.
त्याबरोबरच लोकांना पीपीएफ अकाऊंटमध्ये एका आर्थिक वर्षामध्ये किमान ५०० रुपये आणि कमाल दीड लाख रुपये जमा करावे लागतात. तेव्हाच हे खाते योग्य पद्धतीने कार्यान्वित राहते. जर कुणी आर्थिक वर्षात ५०० रुपये जमा करू शकला नाही, तर खातं डोरमेंट होतं. तसेच पीपीएफ अकाऊंटमध्ये जमा असलेल्या रकमेवर आणि मॅच्युरिटीवर प्राप्त पैशांवर कर लागत नाही.