Lokmat Money > बिझनेस न्यूज > PPF की NPS : कोणती योजना जास्त रिटर्नसाठी फायदेशीर?, गुंतवणुकीआधी वाचा संपूर्ण माहिती

PPF की NPS : कोणती योजना जास्त रिटर्नसाठी फायदेशीर?, गुंतवणुकीआधी वाचा संपूर्ण माहिती

PPF and NPS : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) आणि नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) या दोन सरकारी योजना नोकरदार लोकांमध्ये सेवानिवृत्तीच्या उद्देशाने गुंतवणुकीसाठी खूप लोकप्रिय आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 07:22 PM2022-02-10T19:22:19+5:302022-02-10T19:25:43+5:30

PPF and NPS : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) आणि नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) या दोन सरकारी योजना नोकरदार लोकांमध्ये सेवानिवृत्तीच्या उद्देशाने गुंतवणुकीसाठी खूप लोकप्रिय आहेत

ppf vs nps : which is better investment to build retirement fund  | PPF की NPS : कोणती योजना जास्त रिटर्नसाठी फायदेशीर?, गुंतवणुकीआधी वाचा संपूर्ण माहिती

PPF की NPS : कोणती योजना जास्त रिटर्नसाठी फायदेशीर?, गुंतवणुकीआधी वाचा संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : जर तुम्हाला सेवानिवृत्तीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर सरकारच्या दोन योजना तुम्हाला चांगला रिटर्न म्हणजेच परतावा देऊ शकतात. दरम्यान, एक चांगला सेवानिवृत्तीचा निधी (रिटायरमेंट कॉपर्स) बनवण्‍यासाठी आपल्याला नोकरी सुरू असतानाच निवृत्तीचे नियोजन सुरू केले पाहिजे. 

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) आणि नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) या दोन सरकारी योजना नोकरदार लोकांमध्ये सेवानिवृत्तीच्या उद्देशाने गुंतवणुकीसाठी खूप लोकप्रिय आहेत. पीपीएफमध्ये कोणीही गुंतवणूक करू शकतो. तसेच, नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) सरकारद्वारे चालवली जात आहे. 

नॅशनल पेन्शन सिस्टीम (National Pension System)
तुम्ही कोणत्याही बँक, पोस्ट ऑफिस किंवा विमा कंपनीमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी खाते उघडू शकता. नॅशनल पेन्शन सिस्टीम खात्याच्या मॅच्युरिटीवर, गुंतवणूकदाराला किमान 40 टक्के रक्कम अॅन्युइटीमध्ये टाकावी लागते. या रकमेतून ग्राहकाला पेन्शन मिळते. अॅन्युइटी हा तुमचा आणि विमा कंपनीमधील करार आहे. या करारांतर्गत, नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये किमान 40 टक्के रकमेची वार्षिकी खरेदी करणे आवश्यक आहे. रक्कम जितकी जास्त असेल तितकी पेन्शनची रक्कम जास्त असेल.  अ‍ॅन्युइटी अंतर्गत गुंतवलेली रक्कम निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरूपात मिळते आणि नॅशनल पेन्शन सिस्टीमची शिल्लक रक्कम एकरकमी काढता येते. मात्र, ही पेन्शन कराच्या कक्षेत येते. निश्चित परतावा नाही. इक्विटी आणि डेटमधील गुंतवणुकीतून फंडाने मिळवलेल्या परताव्यावर ते अवलंबून असते.

नॅशनल पेन्शन सिस्टीमचे फायदे
नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या मॅच्युरिटीवर, 60 टक्के रक्कम करमुक्त असते. केवळ 40 टक्के रकमेवर कर आकारला जातो. सरकारी कर्मचाऱ्यांच्या नॅशनल पेन्शन सिस्टीम खात्यात योगदानाची मर्यादा 14 टक्के आहे. तुम्ही या योजनेअंतर्गत कर सूट मागू शकता. कलम 80CCE अंतर्गत कर सवलतीची मर्यादा 1.5 लाख आहे.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund)
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही 15 वर्षांची बचत योजना आहे. यावरील व्याजदर सरकार दर तिमाहीत निश्चित करते. सध्या व्याजदर 7.1 टक्के आहे. जर तुम्ही दरवर्षी पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये 1.5 लाख जमा केले तर 15 वर्षांनंतर ते 7.1 टक्के व्याजदराने 40.68 लाख रुपये होईल. ही मॅच्युरिटी रक्कम करमुक्त आहे. यानंतर, पाच वर्षांच्या ब्लॉकमध्ये पीपीएफ पुढे चालू ठेवता येईल. जर आपण महागाई आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंडच्या करपूर्व परताव्यावर नजर टाकली तर ते अजूनही एक उत्तम गुंतवणूक साधन आहे. दीर्घकालीन सेवानिवृत्ती निधी तयार करण्याचा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा एक चांगला मार्ग आहे. मात्र, यामध्ये मासिक पेन्शनची तरतूद नाही.

मॅच्युरिटी रक्कम आणि व्याज देखील करमुक्त
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खात्यात दरवर्षी जास्तीत जास्त 1,50,000 रुपये जमा करता येतात. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमधील गुंतवणूक आयकर कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहे. यामध्ये मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम आणि व्याज देखील करमुक्त आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. मात्र 7 वर्षांनंतर प्री-मॅच्युअर पैसे काढता येतात. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडवर सध्या 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. कंपाउंडिंग दरवर्षी केले जाते.

Web Title: ppf vs nps : which is better investment to build retirement fund 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.