Lokmat Money > बिझनेस न्यूज > PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स

PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स

केंद्र सरकारनं मुलांसाठी एनपीएस वात्सल्य (NPS Vatsalya Scheme) नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १८ वर्षांखालील मुलांनाही राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) खातं उघडता येतं. पाहूया पीपीएफ आणि एनपीएसपैकी कोणती स्कीम ठरेल बेस्ट.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 10:48 AM2024-09-21T10:48:11+5:302024-09-21T10:49:21+5:30

केंद्र सरकारनं मुलांसाठी एनपीएस वात्सल्य (NPS Vatsalya Scheme) नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १८ वर्षांखालील मुलांनाही राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) खातं उघडता येतं. पाहूया पीपीएफ आणि एनपीएसपैकी कोणती स्कीम ठरेल बेस्ट.

PPF vs NPS Which scheme is best for your children What will get more return Know the details investment tips | PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स

PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स

केंद्र सरकारनं मुलांसाठी एनपीएस वात्सल्य (NPS Vatsalya Scheme) नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १८ वर्षांखालील मुलांनाही राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) खातं उघडता येतं. जेव्हा मुलं मोठी होती तेव्हा या योजनेत त्यांच्या नावे मोठा फंड असेल. अशा परिस्थितीत मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी ही गुंतवणूक योजना आहे. याअंतर्गत पालकांना मुलाच्या नावावर वर्षाला किमान १००० रुपये गुंतवावे लागतील. यात जास्तीत जास्त डिपॉझिट लिमिट नाही. त्यात जमा झालेले पैसे मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काढता येतात.

काय आहे एनपीएस वात्सल्य?

हा एक रिटायरमेंट प्लॅन आहे. आतापर्यंत ही योजना १८ वर्षांवरील लोकांसाठी होती. पण आता १८ वर्षांखालील मुलांसाठीही ती सुरू करण्यात आली आहे. त्याचं नाव एनपीएस वात्सल्य योजना असं आहे. मोठ्या लोकांना मिळणारे सर्व फायदे यातून मिळतील. या योजनेत मुलांचे पालक त्यांच्या नावावर गुंतवणूक करतील. 

या योजनेत मुलांचं खाते किमान तीन वर्षे चालवावं लागणार आहे. यानंतर आणि मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच २५ टक्के रक्कम शिक्षण किंवा उपचारासाठी काढता येते. वयाच्या १८ व्या वर्षानंतर तुम्ही डिपॉझिट रकमेच्या २०% रक्कम काढू शकता. उर्वरित रक्कम अॅन्युइटी म्हणून खरेदी करावी लागणार आहे. म्हणजेच मुलाला दरमहा पेन्शन मिळेल.

पीपीएफ योजना म्हणजे काय?

पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हीदेखील गुंतवणुकीची योजना आहे. मुलांसाठी च्या या योजनेत जास्तीत जास्त लोक गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. मात्र, मोठमोठे लोकही आपल्या नावानं यात गुंतवणूक करू शकतात. यात एक निश्चित इंटरेस्ट असतो. ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. त्यासाठी किमान १५ वर्षे गुंतवणूक करावी लागते. पण नंतर ती ५-५ वर्षांसाठी वाढवता येऊ शकते. या योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडता येतं.

काय आहे फरक?

  • पीपीएफवर सध्या वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळतं. यात निश्चित परताव्याची हमी दिली जाते. सरकार दर तीन महिन्यांनी व्याज दराचा आढावा घेतं. तर, एनपीएसमध्ये वार्षिक व्याजदर सुमारे १० टक्के आहे. हा इक्विटी-लिंक्ड परतावा आहे. त्यावर निश्चित परतावा मिळत नाही.
  • पीपीएफमध्ये ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. एनपीएस वात्सल्यमधील गुंतवणूक वार्षिक एक हजार रुपयांपासून सुरू होते.
  • पीपीएफ ही गुंतवणूक योजना आहे, तर एनपीएस ही वात्सल्य पेन्शन योजना आहे. पीपीएफमध्ये मॅच्युरिटीनंतर कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळत नाही. एनपीएस वात्सल्यमध्ये मॅच्युरिटीवर तुम्ही २० टक्के रक्कम काढू शकाल. उर्वरित ८० टक्के अॅन्युइटी खरेदी करावी लागणार आहे. यामुळे पेन्शन मिळणार आहे.
  • पीपीएफ ही १५ वर्षांची योजना आहे. मात्र, नंतर ती दोनवेळा ५-५ वर्षांसाठी वाढवता येते. त्याचबरोबर एनपीएस वात्सल्यमध्ये फिक्ससारखं काहीच नाही. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ही योजना वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत सुरू ठेवता येते.


एनपीएस वात्सल्यमध्ये किती रक्कम मिळेल?

जर तुमचे मूल तीन वर्षांपेक्षा कमी वयाचं असेल आणि तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत दरमहा एक हजार रुपये गुंतवत असाल तर १५ वर्षात ही रक्कम १.८० लाख रुपये होईल. यावर १० टक्के वार्षिक व्याज गृहीत धरलं तर व्याजाची रक्कम सुमारे २.३८ लाख रुपये होईल. अशा परिस्थितीत १५ वर्षांत एकूण गुंतवणूक सुमारे ४.२० लाख रुपये होईल. त्यापैकी केवळ २० टक्के म्हणजे ८४ हजार रुपये तुम्हाला काढता येईल. उर्वरित रक्कमेची तुम्हाला अॅन्युइटी घ्यावी लागेल. त्यावर वार्षिक सुमारे ६ टक्के व्याज मिळणार आहे. या रकमेतून दरमहा पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. 

तर पीपीएफमध्ये ७.१ टक्के परताव्यासह ही एकूण रक्कम १५ वर्षांत ३.२२ लाख रुपये होईल. अशा तऱ्हेने सुरुवातीला पीपीएफमध्ये मोठी रक्कम उपलब्ध होणार आहे. जर तुम्ही दोन्ही स्कीम्समध्ये अधिक रक्कम गुंतवली तरच तुम्हाला अधिक परतावा मिळेल.

Web Title: PPF vs NPS Which scheme is best for your children What will get more return Know the details investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.