Join us

PPF खात्यातून केव्हा आणि किती रक्कम तुम्ही काढू शकता?; जाणून घ्या नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 16:42 IST

सध्या सरकार PPF खात्यांवर ७.१ टक्क्यांचं व्याज देत आहे.

ठळक मुद्देसध्या सरकार PPF खात्यांवर ७.१ टक्क्यांचं व्याज देत आहे. PPF खातं तीन वर्षे जुनं असल्यास कर्ज घेण्याची मुभा

पब्लिक प्रोविडेंट फँडकडे एका चांगल्या गुंतवणुकीप्रमाणे पाहिलं जातं. दीर्घ कालावधीसाठी हे तुम्हाला उत्तर रिटर्नसह सुरक्षितताही देतं. पब्लिक प्रोविडेंट फंडकडे कमी जोखीम असलेली गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. पीपीएफ खातं १५ वर्षांची मॅच्युअर होतं. गरज भासण्यापूर्वीच गुंतवणूकदार आपल्या पीपीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. तसेच पीपीएफ खात्यावर कर्जाची सुविधादेखील उपलब्ध आहे. सध्या पीपीएफ खात्यावर ७.१ टक्के व्याज मिळत आहे.१५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी पीपीएफ खात्यातून पैसे काढण्याबाबत जितेंद्र सोलंकी म्हणतात, "पीपीएफ खात्यातून सहाव्या वर्षापासून पैसे काढता येतात. ज्या लोकांचे पीपीएफ खाते ५ वर्ष जुने आहेआणि ज्यांना पैशांची आवश्यकता आहे, ते तेथून सहज पैसे काढू शकतात." लाईव्ह मिंटनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.Old Cars on Loan : जुन्या गाड्यांवर 'या' बँका देत आहेत स्वस्त लोन; पाहा पूर्ण यादीपीपीएफ खात्यातून किती पैसे काढता येतात यावर सोलंकी सांगतात की पहिल्या चार वर्षांत किंवा अखेरच्या चार वर्षांत जितकी रक्कम आपण गुंतवलेली असेल तितकी रक्कम त्या खात्यातून काढता येईल. "नियमांनुसार तुम्ही ५ वर्षांपूर्वी आपल्या पीपीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही. परंतु जर तुमचं पीपीएफ खातं ३ वर्षे जुनं असेल तर त्यावर तुम्हाला कर्ज घेता येऊ शकतं," अशी माहिती goodmoneying.com चे संस्थापक मनीकरण सिंघल यांनी दिली. 

टॅग्स :पैसापीपीएफसरकारगुंतवणूक