Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी सरकारच्या या' योजनेला शेतकऱ्यांची पसंती; कोट्यवधी शेतकऱ्यांना झाला लाभ

मोदी सरकारच्या या' योजनेला शेतकऱ्यांची पसंती; कोट्यवधी शेतकऱ्यांना झाला लाभ

Pradhan Mantri Fasal Bima Yojana: चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत या योजनेतील शेतकऱ्यांच्या संख्येत 27% वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 05:34 PM2024-03-06T17:34:48+5:302024-03-06T17:35:23+5:30

Pradhan Mantri Fasal Bima Yojana: चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत या योजनेतील शेतकऱ्यांच्या संख्येत 27% वाढ झाली आहे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana: Farmers like this scheme of Modi government; Crores of farmers benefited | मोदी सरकारच्या या' योजनेला शेतकऱ्यांची पसंती; कोट्यवधी शेतकऱ्यांना झाला लाभ

मोदी सरकारच्या या' योजनेला शेतकऱ्यांची पसंती; कोट्यवधी शेतकऱ्यांना झाला लाभ

Pradhan Mantri Fasal Bima Yojana: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यासांठी केंद्र सरकारने सुरू केलेली 'प्रधानमंत्री फसल विमा' योजनेअंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षात नोंदणीत 27% वाढ झाली आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत प्रत्येक 100 रुपयांच्या प्रीमियमसाठी शेतकऱ्यांना सुमारे 500 रुपये दिले जातात. योजनेची सुरुवात झाल्यापासून, मागील 8 वर्षांमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत 23.22 कोटी पेक्षा जास्त शेतकरी अर्जदारांचे दावे मंजूर करण्यात आले आहेत.

2023-24 मध्ये 56.8 कोटी शेतकऱ्यांना लाभ 
कृषी मंत्रालयाने सांगितले की, 2023-24 या आर्थिक वर्षात पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत 56.8 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही योजना लागू होऊन आठ वर्षे झाली आहेत. 56.80 कोटी शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 23.22 कोटी शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळाली आहे.

शेतकऱ्यांनी 31,130 कोटी रुपये जमा केले
या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांकडून 31,130 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती, त्यापोटी त्यांना 1,55,977 कोटी रुपये अदा करण्यात आले. अशाप्रकारे शेतकऱ्यांनी 100 रुपये भरले असतील तर त्यांना 500 रुपयांचे पेमेंट मिळाले असेल. शासनाच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेत सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे, शेतकरी स्वेच्छेने योजनेचे सदस्यत्व घेत आहेत.

दरवर्षी शेतकरी संख्येत वाढ
प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) ही मागणीवर आधारित योजना आहे आणि ती राज्यांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. 2021-22 आणि 2022-23 मध्ये शेतकरी अर्जांच्या संख्येत वर्षानुवर्षे अनुक्रमे 33.4 टक्के आणि 41 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय 2023-24 या वर्षात आतापर्यंत योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

Web Title: Pradhan Mantri Fasal Bima Yojana: Farmers like this scheme of Modi government; Crores of farmers benefited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.