Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँक अकाऊंटमध्ये पैसे नसतील तरी आता नो टेन्शन; वेळप्रसंगी मिळतील 10,000 रुपये, काय आहे 'ही' योजना

बँक अकाऊंटमध्ये पैसे नसतील तरी आता नो टेन्शन; वेळप्रसंगी मिळतील 10,000 रुपये, काय आहे 'ही' योजना

Pradhan Mantri Jandhan Yojana : केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 18 ऑगस्ट 2021 पर्यंत या योजनेअंतर्गत 43 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 11:27 AM2022-04-12T11:27:19+5:302022-04-12T11:35:56+5:30

Pradhan Mantri Jandhan Yojana : केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 18 ऑगस्ट 2021 पर्यंत या योजनेअंतर्गत 43 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत.

pradhan mantri jandhan yojana pmjdy heres how to avail rs 10000 overdraft facility | बँक अकाऊंटमध्ये पैसे नसतील तरी आता नो टेन्शन; वेळप्रसंगी मिळतील 10,000 रुपये, काय आहे 'ही' योजना

बँक अकाऊंटमध्ये पैसे नसतील तरी आता नो टेन्शन; वेळप्रसंगी मिळतील 10,000 रुपये, काय आहे 'ही' योजना

नवी दिल्ली - प्रधानमंत्री जन धन योजनेला (PMJDY) 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही योजना जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेशन कार्यक्रम असल्याचे सांगितले जाते. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 18 ऑगस्ट 2021 पर्यंत या योजनेअंतर्गत 43 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत.

PMJDY अंतर्गत उघडलेल्या खात्यात खातेधारकांना अनेक सुविधा मिळतात. या योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट नाही. तुमच्या खात्यात शिल्लक नसली तरीही तुम्ही 10,000 रुपये काढू शकता. यासोबत खातेदाराला रुपे डेबिट कार्ड (Rupay Debit Card) आणि ओव्हरड्राफ्ट (Overdraft Service) देण्याची अतिरिक्त सुविधा देण्यात आली आहे.

जन धन योजनेंतर्गत, तुमच्या खात्यात शिल्लक नसली तरीही, 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे. पूर्वी ही रक्कम 5 हजार रुपये होती. सरकारने ती आता 10 हजारांपर्यंत वाढवली आहे. मात्र, ही सुविधा खाते उघडल्यानंतर काही महिन्यांनी मिळते. या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान 6 महिने जुने असावे. अन्यथा फक्त 2,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे.

2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा संरक्षण

योजना यशस्वी व्हावी यासाठी सरकारने 28 ऑगस्ट 2018 नंतर उघडल्या जाणार्‍या अशा जन धन खात्यांसह अपघाती विम्याची रक्कम 2 लाख इतकी वाढवली आहे, जी पूर्वी 1 लाख रुपये होती.

जन धन खाते कसे उघडायचे?

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाते उघडले जाते. परंतु, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जन धन खाते खासगी बँकेत देखील उघडू शकता. जर तुमचे दुसरे बचत खाते असेल तर तुम्ही ते जन धन खात्यात बदलू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, तो जन धन खाते उघडू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: pradhan mantri jandhan yojana pmjdy heres how to avail rs 10000 overdraft facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.