Join us

मोदी सरकारच्या योजनेवर मिळवा 10 हजारांपर्यंत पेन्शन, राहिले फक्त 3 महिने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:35 PM

निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर राहणं ही प्रत्येकाचीच गरज असते.

ठळक मुद्देनिवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच मोदी सरकारनं काही योजना उपलब्ध करून दिल्या आहेतअशाच एका योजनेत पंतप्रधान वया वंदना (PMVVY)योजनेचा समावेश होतो. या सरकारी योजनेत गुंतवलेल्या पैशावर आपल्याला 8 ते 8.30 टक्के व्याज मिळतं.

नवी दिल्लीः निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर राहणं ही प्रत्येकाचीच गरज असते. त्यासाठी बाजारात अशाही काही योजना आहेत, ज्या फक्त निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच उपलब्ध करून दिल्या आहेत. अशाच एका योजनेत पंतप्रधान वया वंदना (PMVVY)योजनेचा समावेश होतो. या सरकारी योजनेत गुंतवलेल्या पैशावर आपल्याला 8 ते 8.30 टक्के व्याज मिळतं. परंतु हे व्याजसुद्धा मासिक, तिमाही आणि सहामाही किंवा वार्षिक पर्यायांवर अवलंबून असतं. जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास 31 मार्च 2020पर्यंत म्हणजे तीन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे.LICच्या माध्यमातून मिळू शकतो या योजनेचा लाभआर्थिक वर्ष 2018-19च्या बजेटदरम्यान केंद्र सरकारनं वरिष्ठ नागरिकांच्या योजनेची अंतिम तारीख वाढवून 31 मार्च 2020 केली होती. त्याची सरकारनं जास्तीत जास्त मर्यादा वाढवून 15 लाख रुपये केली आहे. आपण ही योजना भारतीय जीवन विमा निगम (LIC)च्या माध्यमातूनही घेऊ शकतो. तसेच ही सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीनंही मिळवता येते.या योजनेचे असे आहेत फायदेःया योजनेची मर्यादा 10 वर्षांसाठी असेल. जर आपल्याला 10 वर्षांनंतरही ही योजना कार्यान्वित ठेवायची असल्यास पुन्हा या योजनेत गुंतवणूक करावी लागणार आहे. जर पेन्शन धारक या योजनेचा लाभ घेण्यासाठी 10 वर्षांपर्यंतही जिवंत राहिल्यास त्या संबंधित व्यक्तीला एरियरही दिला जाणार आहे. या योजनेतील कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच पेन्शन धारकाचा मृत्यू ओढावल्यास लाभार्थ्याला उर्वरित रक्कम परत केली जाणार आहे. या पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही लाभार्थी व्यक्ती जिवंत राहिल्यास त्याला पॉलिसीच्या खरेदी रकमेसह अंतिम पेन्शन हप्त्याहप्त्यानं दिली जाते. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ 60 वर्षं आणि त्याहून अधिक वयाचे वरिष्ठ नागरिक घेऊ शकतात. या योजनेसाठी जास्तीत जास्त वयाची काही मर्यादा नाही. या योजनेंतर्गत जर मासिक पेन्शन मिळवू इच्छित असल्यास महिन्याला कमीत कमी 1 हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते. तसेच तुम्ही किती कालावधीसाठी पेन्शन मिळवणार आहात ते पेन्शनच्या रकमेवर अवलंबून असतं. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त मासिक पेन्शन 10000 रुपये मिळते. 

किती पैशात घेऊ शकता 'या' योजनेचा लाभमासिक पेन्शन मिळवण्यासाठी आपल्याला या योजनेत कमीत कमी 1.50 लाख रुपये गुंतवावे लागणार आहेत. 10 हजारांची प्रतिमहिना पेन्शन मिळवण्यासाठी 15 लाख रुपये गुंतवणे आवश्यक आहे.  

टॅग्स :सरकारी योजना