Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रज्ञा - दखलपात्र गुन्हा मिटविण्यात यश

प्रज्ञा - दखलपात्र गुन्हा मिटविण्यात यश

सलोखा निर्माण : तंटामुक्ती समितीचे यश

By admin | Published: February 5, 2015 10:32 PM2015-02-05T22:32:15+5:302015-02-05T22:32:15+5:30

सलोखा निर्माण : तंटामुक्ती समितीचे यश

Pragya - Success to erase interference in crime | प्रज्ञा - दखलपात्र गुन्हा मिटविण्यात यश

प्रज्ञा - दखलपात्र गुन्हा मिटविण्यात यश

ोखा निर्माण : तंटामुक्ती समितीचे यश

कुरुळी : येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या प्रभावी कामकाजामुळे गावामधील वादविवाद, तंटेबखेडे मिटविण्याचे यशस्वी काम होत असल्याने गुण्यागोविंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आणखी एक मोठा दखलपात्र गुन्हा मिटविण्यात आणि त्यांच्यात सलोख निर्माण करण्यात तंटामुक्ती समितीला यश आले आहे. दोन वर्षांत १६० पेक्षा अधिक तंटे तडजोड करून मिटविल्याने तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष एम. के. सोनवणे, सर्व सदस्यांचे गावात कौतुक होत आहे.
कुरुळी कडवस्ती येथील दि. २० जून रोजी झालेल्या मारहाणप्रकरणी भारतीय दंडविधान कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३१३, ५०४ अन्वये बाळासाहेब शांताराम कड विरुद्ध भगवान कड, रोहिदास कड, अण्णासाहेब कड, सोमनाथ कड, मच्छिंद्र कड, विशाल कड यांच्यावर गुन्हा दखल झाला होता. कुरुळी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीने गावातील वादविवाद अर्ज आल्यानंतर अनेक तंटे पोलीस ठाण्याकडे न जाता गावातच मिटविले आहेत. पंचांची जागा सध्या शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीने घेतली असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
या वेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष एम. के. सोनवणे, उपाध्यक्ष दिलीप ढोले, उपाध्यक्ष मल्हारी बागडे, बाळासाहेब बधाले, सुरेश वाघ, गुलाब सोनवणे, किसान माळशीकर,

विला ???

सोनवणे, सावता शिंदे, शरद मुर्‍हे व सर्व सदस्य उपस्थित होते.

फोटो ओळ : कुरुळी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीने दखलपात्र गुन्हा तडजोड

नाम ???

घेऊन मिटविला.
(छाया : गणेश फलके)
०००

Web Title: Pragya - Success to erase interference in crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.