Join us

छोट्या शहरांच्या तुलनेत महानगरांमध्ये Work From Home ला अधिक पसंती; ७१ टक्के कर्मचारी समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 5:27 PM

Work From Home : सध्या कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचारी घरूनच आपलं काम करत आहेत. महानगरांमधील ७१ टक्के कर्मचारी वर्ग वर्क फ्रॉम होमवर समाधानी.

ठळक मुद्देसध्या कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचारी घरूनच आपलं काम करत आहे. महानगरांमधील ७१ टक्के कर्मचारी वर्ग वर्क फ्रॉम होमवर समाधानी.

Coronavirus Pandemic Work From Home : कोरोनाच्या संकटामुळे लोकांची काम करण्याची पद्धतही आता बदलत चालली आहे. फारच कमी वेळात आपण फिजिकलपासून व्हर्च्युअल आणि हायब्रिड वर्किंगकडे गेलो आहोत. अशाच परिस्थितीत देशात कोरोनाची दुसरी लाट आली आणि लोकांनी पुन्हा एकदा व्हर्च्युअल पद्धत अवलंबण्यास सुरूवात केली. यासंदर्भात icici Lombard नं केलेल्या एका सर्वेक्षणात मोठ्या शहरांमधील कर्मचारी वर्क फ्रॉम होममुळे समाधानी असल्याची माहिती समोर आली आहे. वर्क फ्रॉम होम हे अतिशय सुविधाजनक असलं तरी यात काही समस्याही असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं.सर्वेक्षणानुसार ७० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात सुधारणा झाली किंवा कार्यालयाप्रमाणेच असल्याचं म्हटलं. महानगरांमधील केवळ ४ टक्के कर्मचारी आणि छोट्या शहरांमधील ६ टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होममुळे असमाधानी असल्याचं समोर आलं आहे. सर्वेक्षणामध्ये मोठ्या आणि छोट्या शहरांमधील  माहिती आणि तंत्रज्ञान, आर्थिक सेवा, दूरसंचार, ई-कॉमर्स आणि ग्राहकोपयोगी वस्तू अशा विविध ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले.अन्य कामांसाठीही वेळ३४ टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्या घरात वेळ देण्यासोबतच, कुटुंबातील सदस्य, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकत असल्याचं म्हटलं. अपेक्षेनुसार यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या अअधिक म्हणजेच ४३ टक्के होती. दरम्यान, घरून काम करणाऱ्यांपैकी २६ टक्के कर्मचाऱ्यांना व्हिडीओ कॉलची समस्या होती. तर उत्तर देणाऱ्यांपैकी ३६ टक्के लोकांनी आपल्या घरात जागेच्या कमतरतेची समस्या निर्माण होत असल्याचं म्हटलं.नोकरी जाण्याची चिंतावर्क फ्रॉम होममुळे कामावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नसला तरी उत्तर देणाऱ्यांपैकी ६० टक्के कर्मचाऱ्यांना आपली नोकरी जाण्याची चिंता सतावत आहे. छोट्या शहरांमध्ये ५२ टक्के लोकांना तर तुलनेत ६६ टक्के लोकांना आपली नोकरी जाण्याची स्पष्ट चिंता सतावत होती.

हायब्रिड वर्किंग भविष्यहायब्रिड मोड पद्धतीला (आंशिकरित्या कार्यालयातून काम) ५३ टक्के लोकांनी पसंती दिली. प्रत्येक तीन पैकी एका व्यक्तीनं वर्क फ्रॉम ऑफिसची निवड केली, तर १६ टक्के कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय उत्तम असल्याचं म्हटलं. तर दुसरीकडे ज्या हायब्रिड मोड पद्धतीची निवड केली, त्यापैकी ४१ टक्के लोकांनी आठवड्यातून तीन दिवस कार्यालयातून काम आणि २५ टक्के लोकांनी दोन दिवस कार्यालयातून काम करण्यास पसंती दर्शवली.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारतकर्मचारीनोकरी