Lokmat Money > बिझनेस न्यूज > तिकिटासाठी आता प्रीपेड कार्ड; बँका जारी करणार कार्ड आणि वॉलेट, आरबीआयने दिली मंजुरी

तिकिटासाठी आता प्रीपेड कार्ड; बँका जारी करणार कार्ड आणि वॉलेट, आरबीआयने दिली मंजुरी

रिझर्व्ह बँकेने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (एनपीसीआय) पेटीएम ॲपची यूपीआय सुविधा सुरू राहावी यासाठी मदत करण्यास सांगितले आहे. वन९७ कम्युनिकेशन लिमिडेट कंपनीने यासंदर्भात आरबीआयकडे विनंती केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 07:35 AM2024-02-24T07:35:28+5:302024-02-24T07:36:16+5:30

रिझर्व्ह बँकेने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (एनपीसीआय) पेटीएम ॲपची यूपीआय सुविधा सुरू राहावी यासाठी मदत करण्यास सांगितले आहे. वन९७ कम्युनिकेशन लिमिडेट कंपनीने यासंदर्भात आरबीआयकडे विनंती केली होती.

Prepaid card for tickets now RBI approves cards and wallets to be issued by banks | तिकिटासाठी आता प्रीपेड कार्ड; बँका जारी करणार कार्ड आणि वॉलेट, आरबीआयने दिली मंजुरी

तिकिटासाठी आता प्रीपेड कार्ड; बँका जारी करणार कार्ड आणि वॉलेट, आरबीआयने दिली मंजुरी

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्त संस्थांना विविध सार्वजनिक परिवहन यंत्रणांच्या पेमेंटसाठी प्रीपेड पेमेंट इंटरफेस अर्थात प्रीपेड कार्ड जारी करण्यास परवानगी दिली. प्रिपेड कार्डमध्ये प्रवाशांना पैसे जमा करावे लागतील. त्यानंतर तिकीट खरेदी करण्यासाठी त्याचा वापर करता येईल. राेख रकमेसाेबतच प्रवाशांना पैसे देण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध असेल. हा पर्याय पैसे देण्यासाठी सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा असेल, असे आरबीआयने म्हटले आहे.

पेटीएमच्या यूपीआय सेवेसाठी मदत करा

रिझर्व्ह बँकेने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (एनपीसीआय) पेटीएम ॲपची यूपीआय सुविधा सुरू राहावी यासाठी मदत करण्यास सांगितले आहे. वन९७ कम्युनिकेशन लिमिडेट कंपनीने यासंदर्भात आरबीआयकडे विनंती केली होती.

वादविवाद टळतील

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करायचा झाल्यास तिकीट खरेदीसाठी केवळ राेखीनेच पैसे देण्याचा पर्याय उपलब्ध हाेता.

अनेकदा सुट्टे पैसे नसले तर प्रवासी आणि वाहकांमध्ये भांडणेही हाेतात. आता वाद कमी हाेतील.

पीपीआय म्हणजे काय?

पीपीआय म्हणजे एक प्रकारचे प्रीपेड खाते असते. ग्राहकांनी आधीच या खात्यात पैसे जमा केलेले असतात.

इंटरनेट बॅंकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पीपीआयमध्ये पैसे जमा करता येतात. सध्या देशात चार संस्थाच पीपीआय जारी करत आहेत.

Web Title: Prepaid card for tickets now RBI approves cards and wallets to be issued by banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.