Lokmat Money > बिझनेस न्यूज > हमीपत्रांचे पैसे बँकांना देण्यास पीएनबी तयार

हमीपत्रांचे पैसे बँकांना देण्यास पीएनबी तयार

नीरव मोदीने घडविलेल्या १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सर्व ‘लेटर्स आॅफ अंडरटेकिंग’चे (हमीपत्र) पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 03:58 AM2018-03-30T03:58:31+5:302018-03-30T03:58:31+5:30

नीरव मोदीने घडविलेल्या १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सर्व ‘लेटर्स आॅफ अंडरटेकिंग’चे (हमीपत्र) पैसे

Prepare PNB to give money to banks | हमीपत्रांचे पैसे बँकांना देण्यास पीएनबी तयार

हमीपत्रांचे पैसे बँकांना देण्यास पीएनबी तयार

मुंबई : नीरव मोदीने घडविलेल्या १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सर्व ‘लेटर्स आॅफ अंडरटेकिंग’चे (हमीपत्र) पैसे सर्व संबंधित बँकांना परत करण्याचे पंजाब नॅशनल बँकेने मान्य केले आहे. हमीपत्रांवरील अर्धी रक्कम म्हणजे ६,५00 कोटी रुपये ३१ मार्चपर्यंत तसेच उरलेली रक्कम संबंधित बँकांना देय तारखेला दिली जाईल, असे पीएनबीने म्हटले आहे.
घोटाळ्यातील रक्कम कोणी सहन करायची यावरून बँकांमध्ये वाद निर्माण झाला होता. या घोटाळ्याला इतर बँकाही जबाबदार असल्याची भूमिका पीएनबीने आधी घेतली होती. नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांनी पीएनबीमधून मिळविलेल्या हमीपत्रांवर पैसे अदा करताना या बँकांनी कोणत्याही प्रकारे चौकशी केली नाही, असे पीएनबीचे म्हणणे होते.
तथापि, आता पीएनबीने आपल्या भूमिकेवरून माघार घेत घोटाळ्यातील रक्कम आपल्या खात्यावर घेण्याचे मान्य केले आहे. या निर्णयामुळे भारतातील बँकिंग व्यवस्थेला सुलभतेने काम करणे शक्य होईल, असे पीएनबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्विफ्ट यंत्रणा सीबीएसशी लवकरात लवकर जोडण्याचेही पीएनबीने जाहीर केले.

नीरव मोदी याच्या मालकीच्या नीरव मोदी लिमिटेड या कंपनीच्या बर्कलेज बँकेतील खात्यावरील १.२ दशलक्ष पाऊंडाची रक्कम हस्तांतरित करण्यास मनाई करण्यात यावी, यासाठी मुंबईचे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी अनिल देवराव पळसपगार यांच्या न्यायालयाने ब्रिटिश व उत्तर आयर्लंड येथील सरकारी अधिकरणांच्या नावे न्यायिक विनंतीपत्र (लेटर रोगॅटरी) जारी केले आहे.

Web Title: Prepare PNB to give money to banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.