Join us  

वाहन विमा पॉलिसीत मोठ्या बदलाची तयारी, विमा नसलेले वाहन पकडले तर जागेवरच काढावा लागणार विमा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 9:24 AM

जर आपण विमा नसलेले वाह चालवत असाल आणि ट्रॅफिक पोलिसांनी पकडले, तर आपल्याला त्याच ठिकाणी विमा काढावा लागू शकतो. ...

जर आपण विमा नसलेले वाह चालवत असाल आणि ट्रॅफिक पोलिसांनी पकडले, तर आपल्याला त्याच ठिकाणी विमा काढावा लागू शकतो. यासाठी परिवहन मंत्रालय मोठ्या बदलाची तयारी करत आहे. अशा स्थितीत आपल्याला फास्टॅगच्या सहाय्याने त्याच ठिकाणी थर्ड पार्टी विमा काढून दिली जाईल. सरकारी आकडेवारीनुसार, देशभरात जवळपास 40 ते 50% वाहने रस्त्यावर विमान काढताच फिकत आहेत. यांपैकी अनेक वाहनांना अपघातही होतो. खरे तर नियमानुसार, वाहनाचा थर्ड-पार्टी विमा असणे आवश्यक आहे. थर्ड-पार्टी विम्यात अपघातग्रस्तांना उपचासाठी लागणारा खर्चही कव्हर होतो.  

माध्यमांतील वृत्तांनुसार, सरकार एक अशी व्यवस्था तयार करत आहे, जिच्या माध्यमाने पोलीस आणि परिवहन विभागाचे अधिकारी, रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहन अॅपच्या मदतीने पकडलेल्या वाहनाची संपूर्ण माहिती काढू शकतील. अशा स्थितीत वाहनाचा विमा नसेल, तर परिवहन विभागाशी जोडले गेलेले सामान्य विमाकर्ता वाहन धारकाला विमा पॉलिसी खरेदी करण्याचा पर्याय देतील.

अशी असेल प्रक्रिया -माध्यमांतील वृत्तांनुसार, अशा प्रकारे वाहन विमा नसलेल्या चालकांना या पॉलिसीचे प्रीमियम तत्काळ भरता यावे, यासाठी बँकांबरोबरच विमा कंपन्यांनाही फास्टॅग प्लॅटफॉर्मवर आणले जाऊ शकते. यात फास्टॅगमध्ये असलेल्या पैशांच्या सहाय्याने प्रीमियम कापले जाईल. जनरल  इन्शुरन्स काउंसिलच्या एका अधिकाने दिलेल्या माहितीनुसार, काउंसिलच्या बैठकीत तत्काळ विमा पॉलिसीवरही चर्चा झाली होती. याच्या अंमलबजावणीसाठी शिफारशी तयार केल्या जात आहेत आणि 17 मार्चच्या बैठकीतही यावर चर्चा केली जाणार आहे.

किती असतो थर्ड पार्टी विमा -थर्ड पार्टी विम्यासाठी लागणारे प्रीमियम वाहनाच्या आकारावर आणि वयावर अवलंबून असते. 1000सीसीच्या प्रवासी वाहनांसाठी हे 2072 रुपये, 1000-1500सीसी वाहनांसाठी 3,221 रुपये आणि 1,500सीसी इंजिन वाहनांसाठी 7,890 रुपये असते. विमा नियामक IRDA ने यापूर्वीच विमा कंपन्यांना, जप्त केलेल्या वाहनांसाठी तात्पुरता अथवा अल्पकालीन वाहन विमा जारी करण्याची परवानगीही दिली आहे.

टॅग्स :वाहनकारसरकार