Join us

सिम बदलून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची तयारी; पोर्ट, सिम बदलण्याचे नियम कठोर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 5:20 PM

ट्राय मोबाईल ऑपरेटर्सद्वारे सिम कार्ड बदलण्यासाठी आणि जारी करण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी करत आहे.

SIP Card Swaping: दूरसंचार नियामक ट्राय मोबाईल ऑपरेटर्सद्वारे सिम कार्ड बदलण्यासाठी आणि जारी करण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. यासाठी नंबर पोर्टेबिलिटी नियमांमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. सिमकार्ड स्वॅपिंगच्या माध्यमातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.

ट्रायनं या संदर्भात कंपन्या आणि ग्राहकांकडून २५ ऑक्टोबरपर्यंत सूचना मागवल्या आहेत. सिमकार्ड स्वॅपिंगच्या वाढत्या घटनांची दूरसंचार मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून ट्रायला नियम कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात ट्रायनं नुकतीच दूरसंचार कंपन्या आणि नंबर पोर्टिंग ऑपरेटर्ससोबत मंत्रालयाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.

तपास करावा लागणारट्रायच्या नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर, कंपन्यांना सिम पोर्ट करताना आणि ग्राहकाच्या जुन्या नंबरवर नवीन सिम देताना पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. ज्या क्रमांकासाठी पोर्टिंगसाठी अर्ज आला आहे त्या क्रमांकावरून १० दिवस अगोदर सिम स्वॅपची विनंती करण्यात आली आहे का, हे त्यांना तपासावे लागेल.

असं आढळल्यास नंबर पोर्ट केला जाणार नाही. याशिवाय, मोबाइल कंपन्यांना पोर्टिंग ऑपरेटरसोबत नंबर पोर्ट करणाऱ्या ग्राहकाची संपूर्ण माहिती शेअर करणे बंधनकारक असेल. ऑपरेटर याची तपासणी करणार आहे. काही दोष आढळल्यास, सिम स्वॅप किंवा पोर्टची प्रक्रिया थांबविली जाईल.

काय आहे सिम स्वॅपिंगसिमकार्ड स्वॅपिंगमध्ये, फसवणूक करणारे एखाद्या व्यक्तीचं सिमकार्ड त्यांच्या स्वत:च्या बनावट सिमनं बदलतात. यानंतर, त्यांना टेलिकॉम सेवा प्रदात्यानं जारी केलेलं तुमच्या नंबरचं दुसरं सिम मिळतं. त्याचवेळी, हा क्रमांक बँक खात्याशी जोडल्यास सर्व ओटीपी फसवणूक करणाऱ्यांकडे जातात. अशा प्रकारे एखादी व्यक्तीची फसवणूक होऊ शकते.

टॅग्स :ट्रायधोकेबाजी