Join us

टेस्ला पॉवर युएसएकडून पीएएएस मॉडेल सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:36 PM

कंपनीचे सीईओ शैबल घोष म्हणाले, टेस्ला पॉवर युएसएचे पीएएएस मॉडेल वीज साठवण उपायांमध्ये सर्वात मोठी क्रांती ठरणार आहे.

नवी दिल्ली : देशात सर्वात वेगाने वाढणारा ब्रँड म्हणून ओळख निर्माण केलेल्या टेस्ला पॉवर युएसएने भारतीय ग्राहकांसाठी वीज साठवून ठेवण्यासाठी ‘पॉवर ॲज अ सर्विस’ (पीएएएस) मॉडेल सादर केले आहे. नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.

कंपनीचे सीईओ शैबल घोष म्हणाले, टेस्ला पॉवर युएसएचे पीएएएस मॉडेल वीज साठवण उपायांमध्ये सर्वात मोठी क्रांती ठरणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांसह  अनेक क्षेत्रांसाठी मोठा फायदा होणार आहे. 

एमडी कविंदर खुराना म्हणाले, आम्ही भारतात पहिल्याच वर्षात १०० कोटींहून अधिक किमतीची बॅटरी आणि वीज स्टोरेज उत्पादने विकली आहेत. ग्लोबल सीईओ जॉन एच. व्रतसिनास म्हणाले, पीएएएसमुळे देखभाल आणि बॅटरी बदलण्याचा अतिरिक्त भार कमी होणार असून, भारत आपल्या सततच्या वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करू शकणार आहे.

टॅग्स :टेस्लाइलेक्ट्रिक कार / स्कूटरइलेक्ट्रिक कार