Lokmat Money > बिझनेस न्यूज > कार्व्ही फिनटेकमधून अध्यक्ष पार्थसारथी बाहेर; सेबीच्या कारवाईचा परिणाम

कार्व्ही फिनटेकमधून अध्यक्ष पार्थसारथी बाहेर; सेबीच्या कारवाईचा परिणाम

सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगला नवीन ग्राहक स्वीकारण्यास मनाई केल्यामुळे कार्व्ही समूहात भूकंप झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 03:56 AM2019-11-28T03:56:13+5:302019-11-28T03:56:28+5:30

सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगला नवीन ग्राहक स्वीकारण्यास मनाई केल्यामुळे कार्व्ही समूहात भूकंप झाला आहे.

President Parthasarathy out from Carvy FinTech; The result of Sebi's action | कार्व्ही फिनटेकमधून अध्यक्ष पार्थसारथी बाहेर; सेबीच्या कारवाईचा परिणाम

कार्व्ही फिनटेकमधून अध्यक्ष पार्थसारथी बाहेर; सेबीच्या कारवाईचा परिणाम

मुंबई : सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगला नवीन ग्राहक स्वीकारण्यास मनाई केल्यामुळे कार्व्ही समूहात भूकंप झाला आहे. परिणामी, कार्व्ही समूहाचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सी. पार्थसारथी यांनी कार्व्ही फिनटेक कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

कार्व्ही समूह हा शेअर बाजाराशी संबंधित शेअर रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट, गुंतवणूक सल्ला, वित्तीय सेवा आदी विविध सेवा गुंतवणूकदारांना पुरवतो. समूहाच्या १५ उपकंपन्या असून मुख्य कंपनी कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग ही आहे. कार्व्ही फिनटेक ही कंपनी म्युच्युअल फंडांसाठी रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट म्हणून काम करते.

मे महिन्यात सेबीने कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगची चौकशी सुरू केली, तेव्हा या कंपनीने ९५,००० गुंतवणूकदारांचे २३०० कोटीचे शेअर्स परस्पर गहाण ठेवून ६०० कोटी कर्ज घेतल्याचे उघड झाले म्हणून सेबीने कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगला नवीन ग्राहक स्वीकारण्यास मनाई करण्यात आली. मजेची बाब म्हणजे कार्व्ही फिनटेक ही जनरल अ‍ॅटलांटिक या विदेशी गुंतवणूकदार कंपनीने स्थापन केली असून त्यात कार्व्ही समूहाचे फक्त १६.१५ टक्के भांडवल होते. तरीही तीरविवार पर्यंत कार्व्ही समूहाची उपकंपनी होती.
कार्व्ही फिनटेकचे २० पेक्षा म्यच्युल फंड ग्राहक आहे. त्यात बलाढ्य अशा निपॉन इंडिया म्युच्युअल फंड, यूटीआय म्युच्युअल फंड, अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड, मिराई म्युच्युअल फंड यांचा समावेश आहे.

एम. व्ही. नायर यांची नेमणूक

कार्व्ही ब्रोकिंंगवर सेबीने कारवाई केल्याने म्युच्युअल फंड वर्तुळात कार्व्ही फिनटेकबद्दलही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यामुळे कार्व्हा फिनटेक ही कार्व्ही समूहाचा भाग नाही, हा संदेश देण्यासाठी पार्थसारथी हे त्या कंपनीच्या संचालक मंडळातून बाहेर पडले आहेत.
त्यांच्या जागी युनियन बँक आॅफ इंडियाचे माजी अध्यक्ष एम.व्ही. नायर यांची नेणमूक झाली आहे. लवकरच कार्व्ही फिनटेक नावही बदलेल.

Web Title: President Parthasarathy out from Carvy FinTech; The result of Sebi's action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.