नवी दिल्ली : इराकमधील संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी मंगळवारी विनासबसिडीच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात १६.५0 रुपयांनी वाढ केली.व्यावसायिक वापरासाठीच्या गॅसलाही ही दरवाढ लागू राहणार आहे. जेट विमानांच्या इंधनात 0.६ टक्क्यांची दरवाढ करण्यात आली आहे. तत्पूर्वी काल पेट्रोलच्या दरात १.६९ रुपये, तर डिझेलच्या दरात ५0 पैसे प्रतिलिटरची दरवाढ करण्यात आली होती.गेल्या सहा महिन्यांत बिगर सबसिडीच्या स्वयंपाकाच्या गॅस दरात पहिल्यांदाच एवढी वाढ झाली आहे. नव्या धोरणानुसार गॅसधारकांना वर्षाला १२ सिलिंडर सबसिडीच्या दरात मिळणार आहे. १३ व्या सिलिंडर मात्र विनासबसिडीचा असेल. १४.२ किलोच्या सबसिडी नसलेल्या गॅस सिलिंडरची दिल्लीतील किंमत आता ९२२.५0 रुपये होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
विना सबसिडीचा गॅस महागला १६.५0 रुपयांची दरवाढ
By admin | Published: July 02, 2014 4:08 AM