Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वच डाळींचे भाव भिडले गगनाला

सर्वच डाळींचे भाव भिडले गगनाला

येथील बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा कमी असल्याने सलग तिसऱ्या दिवशी डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत.

By admin | Published: October 16, 2015 10:28 PM2015-10-16T22:28:44+5:302015-10-16T22:28:44+5:30

येथील बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा कमी असल्याने सलग तिसऱ्या दिवशी डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत.

The prices of all the pulses have started | सर्वच डाळींचे भाव भिडले गगनाला

सर्वच डाळींचे भाव भिडले गगनाला

नवी दिल्ली : येथील बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा कमी असल्याने सलग तिसऱ्या दिवशी डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. शुक्रवारी तूर डाळ ५०० रुपयांनी, तर उडीद डाळ क्विंटलमागे १०० रुपयांनी महागली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागणी वाढलेली असताना डाळींचा साठा मात्र अल्पसा आहे. तूर डाळीमध्ये वाढ होऊन क्विंटलचा दर १२,५०० वरून १२,९०० पर्यंत पोहोचला आणि १४,१०० वरून १४,३०० वर बंद झाला. उडदाचे दर १०० रुपयांनी वाढून क्रमश: ९९०० वरून ११००० ते ११,१०० आणि ११,००० ते ११,२०० रुपये क्विंटलवर बंद झाले. चांगल्या दर्जाच्या उडीद डाळींचे दर १०० रुपयांनी वाढले. ११,१०० वरुन ११,७०० आणि ११,५०० ते ११,७०० रुपये प्रति क्विंटलवर बंद झाले.
मूग डाळीचे दर ३०० रुपयांनी वाढून ७८०० ते ८४०० आणि ८४०० ते ८८०० रुपयांवर बंद झाले.

Web Title: The prices of all the pulses have started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.