मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे चीनमधून सुट्या भागाचा पुरवठा थांबला आहे. अनेक सुट्या भागांवरील आयात शुल्क वाढले, त्यामुळे गृहोपयोगी उपकरणांच्या कंपन्यांनी फ्रीज, एसी, मायक्रोवेव्ह व वॉशिंग मशीनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या कंपनीमध्ये एलजी, व्होल्टास, सॅमसंग, हायर आणि पॅनासोनिक या कंपन्यांचा समावेश असून या सर्व कंपन्यांनी किमतीत ३.५० टक्के वाढ मार्च महिन्यापासून करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बाजार सूत्रांनी दिली. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे चीनमध्ये अनेक कारखाने बंद ठेवले आहेत. त्यामुळे गृहोपयोगी उत्पादनांना लागणाऱ्या मोटर, कॉम्प्रेसरसारख्या सुट्या भागांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याशिवाय अर्थसंकल्पात या सुट्या भागांवरील आयात शुल्क १० टक्क्यांवरून १२.५० टक्के झाले आहे.
त्यामुळे एअरकंडिशनर, फ्रीज यांच्या किमती ३ टक्क्याने तर वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, ओव्हन यांच्या किमती ५ ते ७ टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे. उन्नत प्रकारच्या गृहोपयोगी उपकरणांच्या किमती त्यामुळे ३,००० ते ४,००० ते वाढतील, असेही सूत्रांनी सांगितले.
गृहोपयोगी उपकरणांच्या किमती वाढण्याची चिन्हे
एलजी, व्होल्टास, सॅमसंग, हायर व पॅनासोनिकची उत्पादनं महागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 03:02 AM2020-02-28T03:02:25+5:302020-02-28T06:55:06+5:30