Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; औषधांच्या किंमतीत एप्रिलपासून होणार वाढ! 

सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; औषधांच्या किंमतीत एप्रिलपासून होणार वाढ! 

prices of medicines from april to go up increase companies seek 20 percent jump : सरकारने औषध निर्मिती कंपन्यांना वार्षिक होलसेल किंमत इंडेक्सनुसार किमतींमध्ये बदल करण्याची परवानगी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 01:23 PM2021-03-20T13:23:41+5:302021-03-20T13:25:46+5:30

prices of medicines from april to go up increase companies seek 20 percent jump : सरकारने औषध निर्मिती कंपन्यांना वार्षिक होलसेल किंमत इंडेक्सनुसार किमतींमध्ये बदल करण्याची परवानगी दिली आहे.

prices of medicines from april to go up increase companies seek 20 percent jump | सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; औषधांच्या किंमतीत एप्रिलपासून होणार वाढ! 

सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; औषधांच्या किंमतीत एप्रिलपासून होणार वाढ! 

Highlightsसरकराने औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वार्षिक होलसेल प्राइस इंडेक्समध्ये (Wholesale Price Index) 0.5 टक्क्यांची वाढ करण्याची परवानगी दिली आहे, असे नॅशनल फार्मास्युटीकल प्रायसिंग अॅथॉरिटीने शुक्रवारी सांगितले आहे.

नवी दिल्ली : देशात खाद्य तेल, पेट्रोल-डिझेल आणि LPG गॅस सिलेंडर यांच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. यातच आता या महागाईच्या संकटात नागरिकांना औषधांसाठीही (Medicines) अधिकचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. सरकराने औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वार्षिक होलसेल प्राइस इंडेक्समध्ये (Wholesale Price Index) 0.5 टक्क्यांची वाढ करण्याची परवानगी दिली आहे, असे नॅशनल फार्मास्युटीकल प्रायसिंग अॅथॉरिटीने शुक्रवारी सांगितले आहे. त्यामुळे वेदना कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या, अँटिइन्फ्लाटीव्ह, कार्डियक आणि अँटिबायोटिक्ससह इतर आवश्यक औषधांच्या किमती एप्रिलपासून वाढण्याची शक्यता आहे. (prices of medicines from april to go up increase companies seek 20 percent jump)

औषधांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता 
सरकारने औषध निर्मिती कंपन्यांना वार्षिक होलसेल किंमत इंडेक्सनुसार किमतींमध्ये बदल करण्याची परवानगी दिली आहे. ड्रग्स प्राइस रेगुलेटर, नॅशनल फार्मास्यूटिकल प्राइसिंग अॅथॉरिटीने शुक्रवारी सांगितले की,  सरकारद्वारे 2020 साठी डब्लूपीआयमध्ये 0.5 टक्क्यांचा वार्षित बदल अधिसूचना आली आहे. तर फार्मा इंडस्ट्रीचे असे म्हणणे आहे की, मॅनिफॅक्चरींगच्या खर्चात 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे कंपन्या किमतीत 20 टक्के वाढीची योजना आखत आहेत. दरम्यान, औषध नियामकद्वारे डब्ल्यूपीआयनुसार अनुसूचित औषधांच्या किंमती वाढविण्यास दरवर्षी परवानगी दिली जाते.

कार्डिओ व्हॅस्क्युलर, डायबिटीज्, अँटिबायोटिक्स, एंटी-इन्फेक्टीव्हज आणि व्हिटॅमिनच्या निर्मितीसाठी बहुतेक फार्मा इन्ग्रीडीएंड (पदार्थ) चीनमधून आयात केले जातात, तर काही अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रीडीएंटसाठी (आयपीआय) चीनवर जवळपास 80-90 टक्के अवलंबून आहे. गेल्या वर्षाच्या सुरूवातीस चीनमधील कोरोना संकटामुळे पुरवठ्यातील अडचणींमुळे भारतातील औषध आयातदारांचा खर्च वाढला. त्यानंतर औषधांच्या किंमती 10 ते 20 टक्क्यांनी वाढविल्या होत्या.

बहुतेक कच्चा माल चीनमधून पुरविला जातो
देशात औषधांच्या निर्मितीसाठी लागणारा बहुतेक कच्चा माल हा चीनमधूनच येत असतो. कोरोना महामारीमुळे या गोष्टीला मोठा फटका बसला आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील लोकांच्या म्हणण्यानुसार, औषध निर्मितीसाठीचा कच्चा माल जर्मनी तसंच सिंगापूरमधूनही येतो. मात्र, चीनच्या तुलनेत याठिकाणाहून आयात केल्या जाणाऱ्या मालाची किंमत जास्त असते. याच कारणामुळे बहुतेक कंपन्या चीनवरुन माल आयात करतात. अँटिबायोटिक गोळ्यांसाठी लागणारा बहुतेक कच्चा मालही चीनमधूनच आणला जातो. नुकतेच सरकारने हेपरिन इंजेक्शनच्या किमतीमध्येही वाढ केली आहे. याचा उपयोग कोरोनावरील उपचारासाठीही केला जातो. चीनमधून एपीआयच्या आयती करात झालेल्या वाढीनंतर सरकारने मागच्या वर्षी जूनमध्ये हेपरिनच्या किमतीत पन्नास टक्के वाढीला परवानगी दिली होती.
 

Web Title: prices of medicines from april to go up increase companies seek 20 percent jump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.