मुंबई: कोरोना संकटामुळे देशातील लाखो लोकांच्या नोकऱ्या गेले. अनेकांनी रोजगार गमावले. कोट्यवधी लोकांना पगार कपात सहन करावी लागली. त्यामुळे अनेकांचं बजेट कोलमडलं. त्यात आता ग्राहकोपयोगी वस्तूंच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुलैपासून टीव्ही, फ्रिज, एसी, लॅपटॉपचे दर वाढू शकतात. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.अबब! कोरोना काळात 'त्या' भारतीयांनी एवढे कमावले, की स्विस बँकांमधील पैसे तिपटीने वाढले
इलेक्ट्रॉनिक उपकरणं तयार करण्यासाठी सुटे भाग लागतात. लॉकडाऊनमुळे सुट्या भागांचं उत्पादन घटलं आहे. त्यामुळे त्यांच्या किमती वधारल्या आहेत. मात्र लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानं रिटेल दुकानं सुरू झाली आहेत. बऱ्याच दिवसांनी दुकानं सुरू झाल्यानं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध स्वरुपाच्या ऑफर दिल्या जात आहेत. विक्री वाढण्यासाठी दुकानदारांचे प्रयत्न सुरू आहेत.आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या 30 लाख नाेकऱ्या धाेक्यात; अल्पकुशल कर्मचाऱ्यांवर संकट
२०२१ मध्ये आतापर्यंत दोनदा कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत १० टक्क्यांनी वाढू शकते. मायक्रोप्रोसेसर आणि पॅनलची कमतरता, कच्च्या मालासह तांब्याच्या किमतीत झालेली वाढ, सुट्या भागांवरील वाढवण्यात आलेली कस्टम ड्युटी यामुळे उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत.
वर्क फ्रॉम होम कल्चर वाढल्यानं, ऑनलाईन शिक्षणामुळे लॅपटॉपची मागणी वाढली आहे. यामुळेही किमतींमध्ये ५ ते ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ कायम राहण्याची दाट शक्यता आहे. ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्यानं कंपन्या कमीतकमी दरवाढ करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे दरवाढीचा काही बोजा ग्राहकांवर टाकून कंपन्या स्वत:ही थोडी झळ सोसत आहेत.