Join us

डाळींचे भाव घसरले

By admin | Published: October 24, 2015 3:41 AM

राज्य शासनाने डाळी व कडधान्याची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई सुरू केल्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मार्केटमधील डाळींची आवक वाढली आहे.

- नामदेव मोरे, नवी मुंबईराज्य शासनाने डाळी व कडधान्याची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई सुरू केल्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मार्केटमधील डाळींची आवक वाढली आहे. तूरडाळीचे दर २० रुपयांची घसरले असून, इतर डाळींचे दरही कमी झाले आहेत. शासनाने धाडसत्र सुरूच ठेवले व कारवाई केलेली डाळ मार्केटमध्ये आणली तर भाव अजून २० ते ३० रुपयांनी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशामध्ये मागील चार महिन्यांमध्ये डाळी व कडधान्याचे भाव गगनाला भिडले होते. आतापर्यंत सामान्यांचा आधार असणाऱ्या डाळी त्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या होत्या. १३ आॅक्टोबरला मुंबई बाजार समितीमध्ये तूरडाळ १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात होती. मूगडाळही १०० ते १२५ रुपयांवर गेली होती. डाळींच्या विक्रमी दरवाढीमुळे देशवासीयांमध्ये प्रचंड असंतोष सुरू झाला होता. विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली होती. डाळींच्या किमती आवक घटल्यामुळे नाही, तर साठेबाजीमुळे वाढल्या होत्या. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांनी साठेबाजांवर कारवाई करावी असे आदेश दिले. यामुळे राज्यातील युती सरकारनेही तत्काळ धाडसत्र सुरू केले. नवी मुंबईसह राज्यभर धाडी टाकून हजारो टन साठा जप्त केला आहे. शासनाच्या धडक कारवाईमुळे साठेबाजांमध्ये खळबळ उडाली आहे. शासनाने कारवाई सुरू करताच डाळींचे भाव नियंत्रणामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी बाजार समितीमध्ये तूरडाळ १३० ते १७५ व मूगडाळ ९० ते ११० रुपये किलो दराने विकली जात होती. चणाडाळ ५ रुपयांनी तर उडीद डाळही जवळपास ५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. मसूर डाळीचे दर मात्र अद्याप फारसे कमी झालेले नाहीत. एपीएमसीमधील दहा दिवसांमधील डाळींचे भाव वस्तू१३ आॅक्टोबर २३ आॅक्टोबर चणाडाळ६५ ते ७५६० ते ७०तूरडाळ१५० ते २००१३० ते १७५मूगडाळ१०० ते १२५९० ते ११०उडीद डाळ१४५ ते १७०१४३ ते १६५मसूर डाळ७५ ते ८५७५ ते ८२डाळीचा भाव प्रति किलो रुपयात