- विजयकुमार सैतवाल
जळगाव : कडधान्य तसेच डाळींची प्रचंड आवक वाढल्याने ऐन खरेदीच्या हंगामात डाळींचे भाव ५०० रुपये प्रतिक्विंटलने कमी झाले आहे. सध्या भाव कमी असले तरीदेखील ग्राहक नसल्याने व्यापारी वर्ग चिंतित झाला आहे. याचा परिणाम शेतकºयांना मिळणाºया भावावरही होणार असल्याचे संकेत दिले जात आहे.
देशातील डाळ निर्मितीमध्ये जळगावचा मोठा वाटा असून, येथे तयार झालेली डाळ देशातील विविध भागासह विदेशातही निर्यात होते. त्यामुळे कडधान्याच्या उत्पादनाचा एकूणच परिणाम जळगावच्या बाजारपेठेवर होत असतो. हल्ली महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान या भागातून मोठ्या प्रमाणात कच्चा माल येऊ लागल्याने उत्पादन वाढल्याने डाळींचे भाव गडगडले असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
>गेल्या वर्षाच्या तुलनेतही भाव कमी
गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात तर डाळींचे भाव कमी झालेच आहे, सोबतच गेल्या वर्षीच्या तुलनेतही ते कमी असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी वरील सर्वच डाळींचे भाव जवळपास यंदाच्या भावापेक्षा ७०० ते ८०० रुपयांनी अधिक होते.
>राजस्थानातही वाढली आवक
सध्या राजस्थानमध्येदेखील दालमिल सुरू झाल्याने तेथूनही डाळींची आवक वाढली आहे. देशातील वेगवेगळ्या भागातील कच्च्या मालासह राजस्थानातून डाळही येऊ लागल्याने आवक वाढून भाव कमी झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
>भाव कमी तरी उठाव नाही
सध्या डाळींचे भाव कमी असले तरी त्यांना मागणी नाही. भाव कमी असल्याने मागणी नसते, असे व्यापाºयांचे म्हणणे आहे. दोन वर्षापूर्वी तूरडाळ दीडशे रुपयांच्या पुढे गेली होती तरीदेखील तिला मागणी होती; मात्र आता कमी भाव असले तरी खरेदी होत नसल्याचे बाजारपेठेत चित्र आहे.
>प्रचंड आवक
यंदा तूर, मूग, उडीद यांचे चांगले उत्पादन आले असून त्यात आता नवीन हरभºयाचीही आवक सुरू झाली आहे. जळगावात दररोज १० ते १५ टन तुरीच्या डाळीची आवक होत असून उडीद, मूग, हरभरा डाळीदेखील सात ते आठ टनापर्यंत पोहचल्या आहेत. जळगावातील डाळमिलसह तुरीची डाळ लातूर, परतवाडा, अकोला, मलकापूर तसेच बर्मा येथूनही येत आहे. अशाच प्रकारे दिल्ली, मध्य प्रदेशसह आॅस्ट्रेलियातून हरभराडाळ, चिखली, मेहकर, अहमदनगर, मराठवाडा, राजस्थानसह बर्मा, थायलंड येथून मुगाची डाळ येत आहे.
>सध्या डाळींची आवक वाढली असून, गेल्या महिन्याच्या तुलनेत डाळींचे भाव कमी झाले आहे. आता उलट खरेदीचा हंगाम असला तरी मागणी नाही.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष,
ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन जळगाव.
ऐन खरेदीच्या हंगामात डाळींचे भाव गडगडले
कडधान्य तसेच डाळींची प्रचंड आवक वाढल्याने ऐन खरेदीच्या हंगामात डाळींचे भाव ५०० रुपये प्रतिक्विंटलने कमी झाले आहे. सध्या भाव कमी असले तरीदेखील ग्राहक नसल्याने व्यापारी वर्ग चिंतित झाला आहे. याचा परिणाम शेतकºयांना मिळणाºया भावावरही होणार असल्याचे संकेत दिले जात आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:14 AM2018-03-03T00:14:29+5:302018-03-03T00:14:29+5:30