प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : यंदा देशात उडीद, मूग, तूर, हरभराच्या बंपर उत्पादनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत डाळींचे भाव क्विंटलमागे ६०० ते ३ हजार रुपयांपर्यंत घसरले आहेत, तर बासमतीची वाढलेली निर्यात व अन्य तांदळाच्या धानचा उतारा घटल्याने याचा परिपाक म्हणजे तांदळाचे भाव क्विंटलमागे ५०० ते २ हजार रुपये दरम्यान वाढले आहेत. त्यामुळे यंदा वरण स्वस्त तर भात महाग अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
देशांतर्गत डाळीचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने योजना आणल्या. त्यात पोषक वातावरणामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व कर्नाटक या राज्यात मूग, उडीदचे भरघोस
उत्पादन झाले आहे. सरकारकडे व व्यापारांकडे मागील वर्षीची तूरडाळ मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे.
बासमतीची सर्वाधिक निर्यात आखाती देश व अमेरिकेला
सुगंध व चवीने खवय्यांना आकर्षित करणारा बासमतीला सध्या विदेशातून मोठी मागणी आहे. यात सर्वाधिक मागणी इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अमिरातील या आखाती देशांतून होत आहे. इराणने या वर्षी बासमती तांदळाची आयात वाढविली आहे. त्याचबरोबर, युरोपियन महासंघातील देश व अमेरिकाही मागील काही वर्षांच्या तुलनेत जास्त बासमती तांदूळ खरेदी करीत आहे. यामुळे बासमतीमध्ये मागील हंगामाच्या तुलनेत यंदा २ हजार रुपयांपर्यंत भाववाढ झाली आहे. प्युअर बासमती सध्या १०,००० ते ११,००० रुपये क्विंटल विकला जात आहे.
तांदूळ खरेदीत करावा लागणार खिसा सैल
एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या काळात देशातून ६३ लाख टन तांदळाची विक्रमी निर्यात झाली आहे, तसेच देशात नवीन धानचा उतारा ३० टक्काने कमी मिळत आहे. परिणामी, देशात हंगामाच्या सुरुवातीलाच तांदळात क्विंटलमागे ५०० ते २००० रुपयांपर्यंत भाववाढ झाली आहे. व्यापाºयांनी सांगितले की, मागील वर्षीपर्यंत कर्नाटकातून महाराष्ट्रात सोनामसुरी तांदूळ येत असे.
यंदा तिथे तुटवडा असल्याने विशेषत: विदभार्तून कर्नाटक व तामिळनाडूला तांदूळ विक्रीला जात आहे. कालीमुछमध्ये १,२०० रुपये वधारून ५,५०० ते ५,८०० रुपये, कोलममध्ये १ हजार रुपये वाढून ५,००० ते ५,४०० रुपये, आंबामोहर ५,५०० ते ६,५०० रुपये, इंद्रायणी ३,७०० ते ४०० रुपये, तर एचएमटी ४,००० ते ४,४०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. खवय्यांना तांदूळ खरेदीसाठी यंदा आपला खिसा सैल करावा लागणार आहे.
बंपर उत्पादनामुळे डाळींचे भाव गडगडले , वरण स्वस्त, भात महाग!
यंदा देशात उडीद, मूग, तूर, हरभराच्या बंपर उत्पादनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत डाळींचे भाव क्विंटलमागे ६०० ते ३ हजार रुपयांपर्यंत घसरले आहेत, तर बासमतीची वाढलेली निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:32 AM2018-01-15T01:32:21+5:302018-01-15T01:32:29+5:30