Join us

डाळींच्या किमती पुन्हा भडकल्या

By admin | Published: January 08, 2016 3:05 AM

मर्यादित पुरवठा आणि त्यातही वाढत्या मागणीमुळे गुरुवारी दिल्ली ठोक बाजारात तूरडाळीसह काही डाळींच्या भावात तेजी आली

नवी दिल्ली : मर्यादित पुरवठा आणि त्यातही वाढत्या मागणीमुळे गुरुवारी दिल्ली ठोक बाजारात तूरडाळीसह काही डाळींच्या भावात तेजी आली. मात्र कमी मागणीमुळे मसूर आणि चणा डाळींच्या भावात घसरणझाली.उत्पादक क्षेत्राकडून होणारा कमी पुरवठा आणि त्यातही मागणी वाढल्याने ठोक बाजारात निवडक वस्तूंचे भाव वाढले. तूरडाळींचे भाव ३५० रुपयांनी वाढून ९५५९ रुपये प्रति क्विंटल झाले.मूग आणि छिल्का असलेली डाळ यांचेही भाव १०० रुपयांनी वाढून ७२००-७८०० रुपये आणि ७८००-८२०० रुपये प्रतिक्विंटलवर बंद झाले. यातही सर्वोत्तम दर्जाच्या डाळींचे भाव १०० रुपयांच्या तेजीसह ८१५० ते ८६५० रुपये आणि ८६५० ते ८८५० रुपये प्रति क्विंटल झाले.पांढरा मटार आणि हिरवा मटार यांचे भाव ३०० रुपयांच्या तेजीसह अनुक्रमे २९०० ते २९२५ रुपये आणि ३२०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटलवर बंद झाले. दुसरीकडे मागणी कमी झाल्याने मसूर छोटी आणि मोठी यांचे भाव ३०० रुपयांनी घसरून अनुक्रमे ५२००, ६२५० रुपये आणि ५३००, ६३०० रुपये प्रतिक्विंटलवर बंद झाले.चण्याचे भाव ४९००, ५५०० रुपयांवरून घटून ४९००, ५३०० रुपये प्रतिक्विंटलवर बंद झाले. चणाडाळ स्थानिक आणि चांगल्या दर्जाचे भाव १०० रुपयांनी घसरून अनुक्रमे ५१५०, ५४५० रुपये आणि ५३५०, ५६५० रुपये प्रति क्विंटल झाले.