Lokmat Money > बिझनेस न्यूज > ग्राहक सुरक्षेसाठी नवा कायदा करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

ग्राहक सुरक्षेसाठी नवा कायदा करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली : ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आपले सरकार नवा कायदा करणार आहे. या कायद्यावर काम सुरू आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 03:59 AM2017-10-27T03:59:11+5:302017-10-27T03:59:28+5:30

नवी दिल्ली : ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आपले सरकार नवा कायदा करणार आहे. या कायद्यावर काम सुरू आहे.

Prime Minister Narendra Modi's announcement will be a new law for consumer protection | ग्राहक सुरक्षेसाठी नवा कायदा करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

ग्राहक सुरक्षेसाठी नवा कायदा करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली : ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आपले सरकार नवा कायदा करणार आहे. या कायद्यावर काम सुरू आहे. दिशाभूल करणा-या जाहिरातींवर कारवाई करण्यासाठी प्रभावी तरतुदी या कायद्यात असतील, तसेच तक्रारींच्या निपटा-यासाठी कालमर्यादा ठरवून दिली जाईल.
मोदी यांनी म्हटले की, आम्ही ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी नवा कायदा करीत आहोत. ग्राहकांचे सबलीकरण करण्यावर या कायद्यात भर राहील. दिशाभूल करणा-या जाहिरातींविरोधात कठोर तरतुदी या कायद्यात असतील. ग्राहकांच्या तक्रारींचा झटपट निपटारा करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ची जागा हा कायदा घेईल. संयुक्त राष्ट्रांनी २०१५मध्ये जारी केलेल्या ग्राहक संरक्षणविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा नव्या कायद्यात समावेश केला जाईल.
मोदी म्हणाले की, आपल्या सरकारला नवा भारत घडवायचा आहे. नव्या भारतात सर्वोत्तम ग्राहक व्यवहार आणि ग्राहकांची भरभराट ही तत्त्वे अंमलात आणली जातील. आपल्या सरकारने तीन वर्षांत बीआयएस कायदा, उज्ज्वला योजना, थेट लाभ हस्तांतरण योजना यांसारखे अनेक उपक्रम राबविले. त्यातून ग्राहकांचे सबलीकरण झालेच, त्याचबरोबर मोठी बचतही झाली.
मोदी यांनी सांगितले, सरकारने केलेल्या जीएसटी कायद्याचाही ग्राहकांना दीर्घकालीन पातळीवर लाभ होईल. जीएसटीमुळे कंपन्यांत स्पर्धा निर्माण होईल. त्यातून किमती कमी होतील. याचा फायदा गरीब आणि मध्यमवर्गीयांना होईल. याशिवाय ग्राहकांची फसवणूकही थांबेल. आपण केंद्र आणि राज्य सरकारांना किती कर देत आहोत, हे ग्राहकास वस्तू खरेदी केल्यानंतर मिळणाºया पावतीवरच कळते.
जीएसटीमुळे मालाच्या वाहतुकीच्या वेळात कपात होईल. त्यामुळेही किमती कमी होतील. जीएसटीमुळे अनेक छुपे कर रद्द झाले आहेत. त्याचा फायदा मध्यमवर्गीयांना होईल.
महागाई कमी झाल्याचा लाभ
गेल्या तीन वर्षांत आपल्या सरकारने महागाई लक्षणीयरीत्या कमी केली आहे. त्याचा ग्राहकांनाच लाभ होत आहे.
घरे घेणाºयांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी रेरा कायदा केला आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi's announcement will be a new law for consumer protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.