झुरीच : स्वीत्झर्लंडमधील चर्चेत असलेल्या बँकांच्या गोपनीयतेच्या भिंती आंतरराष्ट्रीय दडपणामुळे हळूहळू का असेना पडत आहेत. या बँका आणि त्यांचे ग्राहक यांच्यामध्ये आता संवादासाठी सांकेतिक शब्दांचा वापर वाढल्याचे समजते.
अनेक बँकांनी अमेरिकेच्या कर अधिकाऱ्यांशी प्रकरण निकाली काढण्यासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यानंतर पैसे एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठविण्यासाठी आईट्यून्स व गॅस तथा डाऊनलोड अशा सांकेतिक शब्दांचा वापर वाढला आहे. स्वीत्झर्लंडचे सरकार संशयास्पद बेकायदा व्यवहारांच्या खात्यातील पैशांची माहिती भारत आणि इतर देशांना देत आहे. याचबरोबर बँका आपल्या ग्राहकांची माहिती गुप्त राखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भिंतीही पाडत आहे. वेगवेगळ्या स्वीस बँकांनी ताजी माहिती अमेरिकेच्या न्याय विभागाला दिली आहे.
स्वीस बँकांच्या गोपनीय कारभारांमुळे स्वीत्झर्लंड काळ्या पैशाचे नंदनवन ठरला होता.
स्वीस बँकांची गोपनीयता घटतेय; पण हळूहळू
स्वीत्झर्लंडमधील चर्चेत असलेल्या बँकांच्या गोपनीयतेच्या भिंती आंतरराष्ट्रीय दडपणामुळे हळूहळू का असेना पडत आहेत
By admin | Published: October 11, 2015 10:18 PM2015-10-11T22:18:11+5:302015-10-11T22:18:11+5:30