Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएफसाठी खासगी बँकांची सेवा नाही

पीएफसाठी खासगी बँकांची सेवा नाही

खासगी बँकांची सेवा घेण्याचा प्रस्ताव कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) विश्वस्त मंडळाच्या सल्लागार समितीने फेटाळून लावला आहे.

By admin | Published: June 30, 2016 05:20 AM2016-06-30T05:20:41+5:302016-06-30T05:20:41+5:30

खासगी बँकांची सेवा घेण्याचा प्रस्ताव कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) विश्वस्त मंडळाच्या सल्लागार समितीने फेटाळून लावला आहे.

Private banks do not have a PF service | पीएफसाठी खासगी बँकांची सेवा नाही

पीएफसाठी खासगी बँकांची सेवा नाही


नवी दिल्ली : नियोक्त्यांकडून भविष्यनिर्वाह निधी अंशदान जमा करण्यासाठी आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस किंवा एचडीएफसी बँक यासारख्या खासगी बँकांची सेवा घेण्याचा प्रस्ताव कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) विश्वस्त मंडळाच्या सल्लागार समितीने फेटाळून लावला आहे.
ईपीएफओचे विश्वस्त आणि भारतीय मजदूर संघाचे (महाराष्ट्र) सरचिटणीस पी.जे. बाणासुरे यांनी सांगितले की, वित्त, आॅडिट आणि गुंतवणूक समितीने (एफएआयसी) आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस बँक तसेच एचडीएफसी या खासगी बँकांची सेवा घेण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. ईपीएफओद्वारे या क्षणी स्टेट बँक ‘भविष्य निधी’ जमा करते.

Web Title: Private banks do not have a PF service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.