Lokmat Money > बिझनेस न्यूज > खासगी बँकांनाही एनपीएची डोकेदुखी, हजारो कोटींची कर्जे थकीत

खासगी बँकांनाही एनपीएची डोकेदुखी, हजारो कोटींची कर्जे थकीत

देशातील आघाडीच्या सार्वजनिक बँकांनाच नव्हे, तर खासगी बँकांनाही अनुत्पादक कर्जाने (ग्रॉस एनपीए) ग्रासले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 04:30 AM2020-03-02T04:30:35+5:302020-03-02T04:30:42+5:30

देशातील आघाडीच्या सार्वजनिक बँकांनाच नव्हे, तर खासगी बँकांनाही अनुत्पादक कर्जाने (ग्रॉस एनपीए) ग्रासले आहे.

Private banks too suffer from NPA headaches, thousands of crores of loans | खासगी बँकांनाही एनपीएची डोकेदुखी, हजारो कोटींची कर्जे थकीत

खासगी बँकांनाही एनपीएची डोकेदुखी, हजारो कोटींची कर्जे थकीत

विशाल शिर्के 
पुणे : देशातील आघाडीच्या सार्वजनिक बँकांनाच नव्हे, तर खासगी बँकांनाही अनुत्पादक कर्जाने (ग्रॉस एनपीए) ग्रासले आहे. सार्वजनिक बँकांप्रमाणेच खासगी बँकांमध्येही गेल्या पाच वर्षांमध्ये एनपीएत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यात आयसीआयसीआय बँक आघाडीवर असून, तब्बल १ लाख ५ हजार कोटींचा एनपीए अवघ्या पाच वर्षांत झाला आहे. इंड्सइंड, फेडरल, सिटी आणि एचडीएफसी बँकेची हजारो कोटींची कर्जे एनपीए झाली आहेत.
गेल्या आठवड्यात देशातील आघाडीच्या दहा सार्वजनिक बँकांतील एनपीएचे प्रमाण पाहिले. त्यात या बँकांकडे कमीत कमी ८० हजार ते ८ लाख कोटी रुपयांची कर्जे एनपीएत असल्याचे समोर आले होते. स्टेट बँक आॅफ इंडियाकडे २००३-०४ ते २०१४-मार्च २०१९ या कालावधीत तब्बल ८ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जे एनपीए झाली आहेत. खासगी बँकांकडेही एनपीएचे प्रमाण हजारो कोटी रुपयांचे असले तरी सार्वजनिक बँकांच्या तुलनेत त्याचे प्रमाण काहीसे कमी आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) व्यावसायिक प्रफुल्ल सारडा यांना माहिती अधिकारात दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे.
खासगी क्षेत्रातील बँकांच्या एनपीएचा विचार करताना आघाडीच्या सात बँकांतील स्थिती ध्यानात घेतली आहे. त्यात फेडरल बँक लिमिटेड, एचडीएफसी, आयसीआयसीआय, इंड्सइंड, कर्नाटका बँक, लक्ष्मी विलास आणि सिटी बँकेचा समावेश आहे. या बँकांपैकी केवळ आयसीआयसीआय बँकेचे एनपीए २००३-०४ ते २०१३-१४ या कालावधीत ६६ हजार ७२९ कोटी रुपये होता. एचडीएफसी १२ हजार १११ आणि इतर बँकांचा ३ ते १० हजार कोटी रुपयांदरम्यान एनपीए होता. मात्र, २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीत सर्वच बँकांच्या एनपीएमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
>दीड वर्षात २९ हजार कोटींची वसुली
खासगी बँकांचे एनपीएमधे हजारो कोटी रुपये अडकले आहेत. बँकांकडे २००३ ते २०१९ या कालावधीत एनपीएतील नक्की किती वसुली झाली, याची सविस्तर आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. आर्थिक वर्ष
२०१७-१८ मध्ये १६ हजार ४६७ आणि एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत १२ हजार २८७ अशा २८ हजार ७५४ कोटी रुपयांची वसुली झाल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली.
>एनपीएची रक्कम कोटी रुपयांत
बँक २००३-२०१४ २०१४-मार्च २०१९ एकूण
फेडरल ८,१७६ ८,३३६ १६,५१२
एचडीएफसी २१,१११ २४,०९५ ३६,२०६
आयसीआयसीआय ६६,७२९ १,०५,३६० १,७२,०८९
इंड्सइंड ३,१६५ ४,७२१ ७,८८६
कर्नाटका ५,३०१ ६,९१८ १२,२१९
लक्ष्मी २,१९३ ४,७२६ ६,९१९
सिटी ९,६५५ ४,८४० १४,४९५

Web Title: Private banks too suffer from NPA headaches, thousands of crores of loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.