अकोला : राज्यात खरीप हंगामातील कापसाची मोठी आवक सुरू झाली; परंतु महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने मोजकीच कापूस खरेदी केंद्रे सुरू केली असून, भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अद्याप कापूस खरेदी सुरू केली नाही. सलग पाच दिवस शासकीय सुटी असल्याने पणन महासंघाची कापूस खरेदी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडील कापूस खासगी बाजारात कमी अधिक दरात विकावा लागत आहे. खासगी बाजारात राज्यात आजमितीस ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.
कापूस नगदी पीक असून, कापसाचा हंगाम आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. ऐन दसरा-दिवाळी सणाच्या मुहूर्तावरच हा कापूस हंगाम सुरू होत असल्याने शेतकऱ्यांची हाती कापूस विक्रीचा पैसा येतो, त्यामुळे या सणाचा आनंद व्दिगुणित होतो. यावर्षी पणन महासंघाने दिवाळीपूर्वी २० कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत, असे असली तरी ही केंद्र मोजक्याच काही जिल्ह्यांच्या ठिकाणी असल्याने यावर्षी शेतकऱ्यांना कापूस विक्रीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खेडा खरेदीदार व खासगी बाजारात कमी अधिक दरात कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भारतीय कापूस महामंडळानेदेखील यावर्षी कापूस खरेदी केंद्र सुरू केली नाहीत.
दरम्यान, मागील वर्षी ४०५० रुपये हमीदर होते. तथापि, या दरापेक्षा कमी दराने खासगी बाजारात कापसाची खरेदी करण्यात आली. यावर्षी हमीदर ४१०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. सध्या खासगी बाजारात कापसाची प्रत बघून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे खासगी बाजारात कापसाच्या हवी तेवढी वृद्धी नाही तथापि शेतकऱ्यांना सणासुदीसाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी खासगी बाजारात कापसाची विक्री करीत आहेत. केंद्र सुरू केले तेव्हापासून १० नोव्हेंबरपर्यंत पणन महासंघाने वाशिम जिल्ह्यातील कारंजा खरेदी केंद्रावर ५०० क्ंिवटल कापूस खरेदी केला आहे.
खासगी कापूस खरेदी ३३ लाख क्ंिवटल!
राज्यात खरीप हंगामातील कापसाची मोठी आवक सुरू झाली; परंतु महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने मोजकीच कापूस खरेदी केंद्रे सुरू केली
By admin | Published: November 14, 2015 01:31 AM2015-11-14T01:31:27+5:302015-11-14T01:31:27+5:30