Join us

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही मिळणार २० लाखांपर्यंत टॅक्स फ्री ग्रॅच्युइटी, विधेयकाला लोकसभेत मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 6:39 PM

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. आता खाजगी क्षेत्रात काम करत  असलेल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा...

नवी दिल्ली -  खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. आता खाजगी क्षेत्रात काम करत  असलेल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा २० लाखांपर्यंत टॅक्स फ्री ग्रॅच्युइटी मिळणार आहे. यासंदर्भातील पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अमेंडमेंट बिल २०१७ ला आज लोकसभेत मान्यता देण्यात आली. या विधेयकामध्ये  खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि स्वायत्त उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या तरतुदीनुसार सीसीएस( पेन्शन) नियमावलीमध्ये समाविष्ट नसलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे.  लोकसभेत विविध प्रश्नांवरून सुरू असलेल्या गोंधळामध्येच लोकसभेच्या सभागृहात या विधेयकाला आवाजी मतदानाने मान्यता देण्यात आली. त्याअंतर्गत केंद्र सरकारच्या नियमित सेवेत समाविष्ट असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना सध्याच्या १२ आठवड्यांच्या प्रसुती रजेऐवजी २६ आठवड्यांची प्रसुती रजा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.  केंद्रीय श्रम मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी हे विधेयक लोकसभेमंध्ये मंजुरीसाठी मांडले होते.  

टॅग्स :कर्मचारीव्यवसायभारतअर्थव्यवस्था