Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोटा नष्ट करण्याची प्रक्रिया अपूर्णच, विटा बनवून निविदा प्रक्रियेने विल्हेवाट

नोटा नष्ट करण्याची प्रक्रिया अपूर्णच, विटा बनवून निविदा प्रक्रियेने विल्हेवाट

नोटाबंदीत बाद केलेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटांचा खरेपणा तपासून, त्यांची मोजणी झाल्यानंतर नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:23 AM2018-03-19T01:23:33+5:302018-03-19T01:23:33+5:30

नोटाबंदीत बाद केलेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटांचा खरेपणा तपासून, त्यांची मोजणी झाल्यानंतर नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

The process of elimination of notes is incomplete, making bricks, disposal by tender process | नोटा नष्ट करण्याची प्रक्रिया अपूर्णच, विटा बनवून निविदा प्रक्रियेने विल्हेवाट

नोटा नष्ट करण्याची प्रक्रिया अपूर्णच, विटा बनवून निविदा प्रक्रियेने विल्हेवाट

नवी दिल्ली : नोटाबंदीत बाद केलेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटांचा खरेपणा तपासून, त्यांची मोजणी झाल्यानंतर नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुकडे करून या नोटांच्या छोट्या विटा तयार करून, नंतर निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांची विल्हेवाट लावण्यात येत आहे, असे रिझर्व्ह बँकेने कळविले आहे.
बाद झालेल्या १५.२८ लाख रुपये मूल्याच्या नोटा ३० जून २०१७ पर्यंत बँकांकडे जमा झाल्याचे रिझर्व्ह बँकेने यापूर्वी म्हटले होते. या नोटांची अत्याधुनिक चलन सत्यापन व मोजणी होऊन त्यावर प्रकिया केली जात आहे. देशभरात विविध कार्यालयांतील अत्याधुनिक ‘सीव्हीपीएस’ यंत्रे यासाठी वापरली जात आहेत.
नोटा कापून तुकडे केल्यानंतर त्यांचे विटांसारखे तुकडे केले जातील आणि त्यानंतर त्या निविदा प्रक्रियेद्वारे नष्ट केल्या जातील. अशा नोटांवर आरबीआय पुनर्प्रक्रिया करीत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
चिदंबरम यांचा चिमटा
नोटाबंदीला अनेक महिने उलटली, तरी बाद नोटांची मोजणी अद्याप संपलेली नाही, यावरून माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी काँग्रेस महाधिवेशनात चिमटा काढला. तिरुपती मंदिराच्या दानपेटीत टाकल्या जाणाऱ्या नोटांची मोजणी तेथील कर्मचारी याहून झटपट करतात. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने त्यांची मदत घ्यावी, असे चिदंबरम उपरोधाने म्हणाले.
>९९ टक्के नोटा परत आल्या
सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्या नोटा देशातील नागरिकांनी बँकांमध्ये जमा केल्या. आरबीआयने २०१६-१७च्या वार्षिक अहवालात गतवर्षी ३० आॅगस्ट रोजी स्पष्ट केले होते की, बँकेकडे १५.२८ लाख कोटी म्हणजेच ९९ टक्के नोटा परत आल्या आहेत. १५.४४ लाख कोटींपैकी १६,०५० कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या नाहीत. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० रुपयांच्या १,७१६.५ कोटी, तर १,००० रुपयांच्या ६८५.८ कोटी नोटा चलनात होत्या. त्यांचे मूल्य १५.४४ लाख कोटी रुपये होते.

Web Title: The process of elimination of notes is incomplete, making bricks, disposal by tender process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.