Join us

Coronavirus : लसीकरणासाठी Procter & Gamble देणार ५० कोटींचा निधी; ५ लाख भारतीयांना मिळणार लस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 8:45 PM

कंपनी आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मागे १०० नागरिकांचं करणार लसीकरण

ठळक मुद्देकंपनी आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मागे १०० नागरिकांचं करणार लसीकरणकंपनीकडून दिला जाणार ५० कोटींचा निधी

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थिती आता अनेक उद्योजकही पुढे येत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणारासाठी कंपनी ५० कोटी रूपयांचं योगदान देणार असल्याची माहिती एफएमजीसी कंपनी प्रॉक्टर अँड गँबल (Procter & Gamble) यांनी दिली. या अंतर्गत सरकार आणि स्थानिक संस्थांसोबत मिळून पाच लाख भारतीयांचं लसीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय कंपनी आपल्या भारतातील ५ हजार कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांचंही लसीकरण करणार आहे. भारताच्या कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढत्या सक्रिय भूमिका साकारण्यास प्रॉक्टर अँड गँबल ही कंपनी कटिबद्ध आहे. आम्ही भारतातील आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मागे १०० नागरिकांचं लसीकरण करत १० लाख लसीच्या डोससाठी ५० कोटी रूपयांची मदत करणार आहोत, अशी माहिती कंपनीचे भारतीय उपखंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुसुदन गोपालन यांनी दिली. "कोरोनासारख्या महासाथीविरोधात सुरू असलेल्या लढाईत आरोग्य तज्ज्ञ, मदत करणाऱ्या संस्था, सरकार आणि उद्योजकांनी एकत्र येण्याची तातडीची गरज आम्ही ओळखतो. सद्य परिस्थितीत आणि पुढील कालावधीत लस ही कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. आमचा ठाम विश्वास आहे की नागरिकांसाठी लसीकरणाचे उपक्रम हाती घेणारी राज्य सरकारं आणि स्थानिक संस्था यांच्याशी भागीदारी केल्यानं आपण ज्या समाजात कार्य करीत आहोत त्या समुदायांना महत्त्वपूर्ण बदल करण्यास मदत होईल," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसभारतपैसा