Lokmat Money > बिझनेस न्यूज > बिझनेसमध्ये स्कीलपेक्षा पर्सनॅलिटीवर ठरते नफ्याचे गणित

बिझनेसमध्ये स्कीलपेक्षा पर्सनॅलिटीवर ठरते नफ्याचे गणित

हायपर आइसलँड या डिजिटल शिक्षण कंपनीने 5 हजार बिझनेस लीडर्सचा सर्वे केला. त्यामध्ये 78 टक्के लीडर्सनी कंपनीसाठी कर्मचारी निवडताना..

By admin | Published: June 29, 2017 01:22 PM2017-06-29T13:22:27+5:302017-06-29T13:22:27+5:30

हायपर आइसलँड या डिजिटल शिक्षण कंपनीने 5 हजार बिझनेस लीडर्सचा सर्वे केला. त्यामध्ये 78 टक्के लीडर्सनी कंपनीसाठी कर्मचारी निवडताना..

Proficiency in profits on personal profits | बिझनेसमध्ये स्कीलपेक्षा पर्सनॅलिटीवर ठरते नफ्याचे गणित

बिझनेसमध्ये स्कीलपेक्षा पर्सनॅलिटीवर ठरते नफ्याचे गणित

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 29 - व्यवसाय करताना बिझनेस रिलेशनशीप खूप महत्वाची असते. तुमच्याकडे किती कौशल्य आहे त्यापेक्षा समोरच्या क्लायंटबरोबर तुमचे बिझनेस रिलेशन कसे आहेत यावर नफ्याचे गणित जास्त प्रमाणात अवलंबून असते असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. स्कील म्हणजेच कौशल्य शिकून घेता येते. पण रिलेशनशीपचे स्कील स्वत:लाच विकसित करावे लागते. 
 
आपण एखादे काँट्रेक्ट मिळवण्यासाठी जातो त्यावेळी आपल्याकडे फायनान्स प्लान, उद्दिष्टय आणि अंमलबजावणीचा कालावधी याची सविस्तर योजना तयार असते. पण रिलेशनशीचे काय? त्या आघाडीवर आपली किती तयारी असते. रिलेशनशीप जपणे, वाढवणे हे  तुमच्या पर्सनॅलिटीवर अवलंबून असते. त्यामुळे बिझनेसमध्ये कौशल्यापेक्षा तुमचे व्यक्तीमत्व महत्वाचे ठरते. 
 
हायपर आइसलँड या डिजिटल शिक्षण कंपनीने 5 हजार बिझनेस लीडर्सचा सर्वे केला. त्यामध्ये 78 टक्के लीडर्सनी कंपनीसाठी कर्मचारी निवडताना पर्सनॅलिटीला जास्त प्राधान्य देत असल्याचे सांगितले. पर्सनॅलिटीमुळेच समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल कुतूहल निर्माण होते आणि पर्सनॅलिटीच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ठरवते. तुम्ही कितीही हुशार असाल पण तुम्ही योग्य संवाद साधत नसाल तर क्लायंट तुमच्याकडे का येतील?. 
 
बिझनेस रिलेशन बिझनेससाठी आवश्यक असली तरी, त्यापलीकडे जाऊन भविष्यासाठी संबंध विकसित करणे आवश्यक असते. तुम्ही व्यक्तीगत आयुष्यात जास्त वेळ अशा व्यक्तींबरोबर घालवता ज्यांच्याबद्दल तुम्हाला विश्वास वाटतो. ज्यांच्याशी बोलायला तुम्हाला आवडते. जो विचार तुम्ही खासगी आयुष्याबद्दल करता तसाच तुम्ही तो प्रोफेशनल लाईफबद्दल करायला काय हरकत आहे ?. तुमच्या व्यक्तीमत्वामध्ये ज्या जमेच्या बाजू आहेत त्याचा बिझनेस आणि स्वत:च्या फायद्यासाठी पुरेपूर तुम्हाला वापर करुन घेता आला पाहिजे. 
 

Web Title: Proficiency in profits on personal profits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.