नवी दिल्ली : सलग २0 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ योगदान देणाऱ्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) निवृत्तीच्या वेळी ५0 हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ देणार आहे. याशिवाय एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांची किमान रक्कम उपलब्ध करून दिली जाईल. ईपीएफओच्या संचालक मंडळाने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या सदस्यांनाही या सुविधेचा लाभ मिळेल. अपंगत्व आलेल्या सदस्याचे योगदान २0 वर्षांपेक्षा कमी कालावधीचे असले तरी ‘लॉयल्टी-कम-लाइफ’चा लाभ त्याला दिला जाईल. पीएफवर यंदा ८.६५ टक्के व्याजकर्मचारी भविष्य निधीचे (प्रॉव्हिडंट फंड) सदस्य असलेल्या चार कोटींहून अधिक नोकरदारांना त्यांच्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर वर्ष २०१६-१७साठी ८.६५ टक्के दराने व्याज मिळेल, असे केंद्रीय श्रममंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी गुरुवारी सांगितले. ‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने गेल्या डिसेंबरमध्ये याच दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला होता व त्यास सरकारची मंजुरी मिळणे बाकी होते. दरम्यान, हा व्याजदर अर्धा टक्क्याने कमी करण्याचा आग्रह वित्त मंत्रालयाने धरल्याच्या बातम्या आल्याने व्याजदराविषयी साशंकता होती. परंतु श्रममंत्र्यांच्या वक्तव्याने आता ती दूर झाली आहे.ईपीएफओची धोरणे ठरविणाऱ्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (सीबीटी) यासंबंधीच्या शिफारशी केल्या आहेत. विश्वस्त मंडळाची महत्त्वाची बैठक काल झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या जमा रकमेशी संबंधित विमा योजनेत (ईडीएलआय) सुधारणा करण्याची शिफारस केली. या सुधारणेनुसार कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास अडीच लाखांचा लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
ईपीएफओ सदस्यांना मिळणार ५0 हजारांचा लाभ
By admin | Published: April 14, 2017 5:21 AM