Lokmat Money > बिझनेस न्यूज > अल्पबचतीत फायदा, व्याजदरात मोठी वाढ; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच गुंतवणूकदारांना गिफ्ट

अल्पबचतीत फायदा, व्याजदरात मोठी वाढ; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच गुंतवणूकदारांना गिफ्ट

आयकर सवलत न मिळणाऱ्या पोस्टाच्या बचत योजनांच्या व्याजदरात केंद्र सरकारने वाढ केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 07:15 AM2022-12-31T07:15:02+5:302022-12-31T07:16:01+5:30

आयकर सवलत न मिळणाऱ्या पोस्टाच्या बचत योजनांच्या व्याजदरात केंद्र सरकारने वाढ केली.

profit in small savings big increase in interest rate a gift to investors on new year eve | अल्पबचतीत फायदा, व्याजदरात मोठी वाढ; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच गुंतवणूकदारांना गिफ्ट

अल्पबचतीत फायदा, व्याजदरात मोठी वाढ; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच गुंतवणूकदारांना गिफ्ट

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली: आयकर सवलत न मिळणाऱ्या पोस्टाच्या बचत योजनांच्या व्याजदरात केंद्र सरकारने शुक्रवारी वाढ केली. पीपीएफ व सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर पाच टक्के कायम ठेवला आहे. करपात्र उत्पन्न असणाऱ्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना व किसान विकास पत्र (केव्हीपी)  यावरील व्याजदर १.१ टक्क्यांनी वाढविला आहे. पोस्टातील एक वर्षांच्या ठेवींवर ६.६ टक्के, दोन वर्षांच्या ठेवींवर ६.८ टक्के, ३ वर्षांच्या ठेवींवर ६.९ टक्के, तर ५ वर्षांच्या ठेवींवर ७% व्याज मिळेल.

- मासिक उत्पन्न योजनेच्या व्याजदरात ४० बेसिस पॉइंटने वाढ केली आहे. या योजनेचा व्याजदर आता ७.१ टक्के असेल.

- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांचा व्याजदर २० बेसिस पॉइंटने वाढवून ७ टक्के करण्यात आला आहे.

अल्पबचत योजनांवरील व्याजदर

योजना    आधीचा दर     नवा दर
बचत ठेव    ४.०%    ४.०%
१ वर्षाची ठेव    ५.५%    ६.६%
२ वर्षांची ठेव    ५.७%    ६.८%
३ वर्षांची ठेव    ५.८%    ६.९%
५ वर्षांची ठेव    ६.७%    ७.०%
५ वर्षांची आवर्ती ठेव    ५.८%    ५.८%
ज्येष्ठांची बचत योजना    ७.६%    ८.०%
मासिक उत्पन्न योजना    ६.७%    ७.१%
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र    ६.८%    ७.०%
पीपीएफ    ७.१%    ७.१%
किसान विकास पत्र    ७.०%    ७.२%
    (१२३ महिने)    (१२० महिने)
सुकन्या समृद्धी योजना    ७.६%    ७.६%

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: profit in small savings big increase in interest rate a gift to investors on new year eve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.