Join us

नफेखोरीने सोन्याची चमक झाली फिकी

By admin | Published: June 30, 2014 10:32 PM

विक्री केल्याने राजधानी नवी दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव 55 रुपयांनी कमी होऊन 28,475 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्टांनी नफेखोरी करीत सातत्याने विक्री केल्याने राजधानी नवी दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव 55 रुपयांनी कमी होऊन 28,475 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. औद्योगिक संस्थांकडून कमी मागणी झाल्याने चांदीचा भावही 18क् रुपयांनी कोसळून 44,8क्क् रुपये प्रतिकिलो झाला.
मागणी नसल्याचा बाजारधारणोवर नकारात्मक परिणाम झाला. लंडन बाजारात सोन्याचा भाव क्.1 टक्क्याने कमी होऊन 1,314.99 डॉलर प्रतिऔंस राहिला. चांदीचा भावही क्.3 टक्क्याने उतरून 2क्.91 डॉलर प्रतिऔंस झाला.
 (लोकमत न्यूज नेटवर्क)